कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » साताऱ्यात राजकीय भूकंप! बंडखोर Vs मनोमिलन — कोण पडणार, कोण उभा राहणार?

साताऱ्यात राजकीय भूकंप! बंडखोर Vs मनोमिलन — कोण पडणार, कोण उभा राहणार?

साताऱ्यात राजकीय भूकंप! बंडखोर Vs मनोमिलन — कोण पडणार, कोण उभा राहणार?

सातारा (अली मुजावर )-सातारा नगरपालिका 2025 : मनोमिलनातील भाजपला ‘बंडखोरांचा विस्फोट’! राष्ट्रवादीची डॉक्टर काटे अश्वशक्तीने एंट्री — साताऱ्याचे राजकारण तापले

सातारा शहरातील आगामी नगरपालिका निवडणूक 2025 च्या तोंडावर भाजपच्या नेत्तृत्वात मनोमिलन करून एकत्र आलेले खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आता स्वतःच्या घरातल्याच बंडखोर उमेदवारांच्या अडथळ्यांशी झुंजत असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. मनोमिलनाचे राजकीय शो पीस आता भाजपला डोकेदुखी ठरू लागल्याची चर्चा चांगलीच गाजू लागली आहे.

दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातील निवडणूक ताकतीने आणि आक्रमक पद्धतीने लढवणार असल्याचा बिगुल वाजवला आहे. राष्ट्रवादीची ही घोषणा भाजपच्या ‘एकजुटीच्या’ दाव्याला थेट आव्हान देणारी ठरत आहे. सगळ्यात सर्वाधिक चर्चेत आले आहे ते डॉ. काटे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे.त्यान्च्या एंट्रीनंतर शहरात एकच चर्चा —

“काटेंच्या उमेदवारीने सत्ताधारी, की सातारकर घडवणार नवा निकाल?” याकडे सातारकर उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

भाजपच्या गोटात वाढलेले बंड, राष्ट्रवादीची आक्रमक मोहीम, आणि डॉ. काटे यांची जोरदार उपस्थिती —या तिहेरी घडामोडींमुळे सातारा नगरपालिका निवडणूक राज्याच्या राजकीय नकाशावर सर्वाधिक तापलेली लढत ठरू लागली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket