साताऱ्यातील विद्युत पोलवर झळकले फ्लेक्स
सातारा प्रतिनिधी -साताऱ्यातील विद्युत पोलवर विना परवानगी घेता राजरोसपणे विद्युत पोलवर फ्लेक्स व्यावसायिक झळकवत आहे रस्त्यावरील वाहने व ये जा करणाऱ्या साठी ते धोकादायक ठरू शकते वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने यापूर्वी असं फ्लेक्स पडलं आहेत मुळात विद्युत पोलवर फ्लेक्स लावण्यास मनाई असताना व्यावसायिक बेधडकपणे जाहिरात करणाऱ्यांचे धाडस कसं करतात हेच सर्वसामान्य जनतेला उमजत नाही.
खरे तर विद्युत पोलवर बऱ्याचदा लाईट गेल्यावर वायरमन ला कामं करताना अशा फ्लेक्स ची खुप अडचण होती विधूत पोलवरील संबंधितांना फ्लेक्स त्वरित काढून विधूत पोल फ्लेक्स मुक्त करावा वास्तविक विधूत पोलवरील जाहिरात करणाऱ्यास नगरपालिका ने सक्त मनाई करून हि हे जाहीरातदार राजरोसपणे जाहिरात झळकुन मनमानी कारभार करीत आहेत यांना चाप लावणे व संबंधितांवर गुन्हे दाखल केले पाहिजे हि जनतेतून आता मागणी होत आहे.
श्रीरंग काटेकर.सातारा.
