साताऱ्याच्या रेकॉर्डवरील आरोपी लखन भोसले चा पुण्यात एन्काऊंटर
पुणे – पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुख्यात घरपोडी प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला. लखन भोसले असे मृत आरोपीचे नाव असून तो अनेक घरपोडी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या वांटेड लिस्ट मध्ये होता. ही कारवाई 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. त्याचा दुसरा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर परिसरात गेल्या काही दिवसापासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. या घटकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला असता संशयित आरोपी लखन भोसले आणि त्याचा साथीदार या भागात असल्याची टीप मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी लखन भोसले ने चाकूचा धाक दाखवून सातारा येथे दागिने चोरी केले होते. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. या प्रकरणानंतर तो फरार झाला होता. अटक करण्याच्या प्रयत्नात लखन भोसलेने पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस गंभीर जखमी झाले.
लखन भोसले हा खटाव तालुक्यातील असून त्याच्यावर सातारा सांगली कोल्हापूर पुणे जिल्ह्यात घरपोडी दरोडे चोरी मारहाण अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपींनी पोलिसावर शस्त्रासह हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत लखन भोसले जागीच ठार झाला. मात्र त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.





