Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सातारकर मित्रांचा सामाजिक उपक्रम

सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सातारकर मित्रांचा सामाजिक उपक्रम 

सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सातारकर मित्रांचा सामाजिक उपक्रम 

भुईंज ( महेंद्र जाधवराव )यशोधन सह गगनगिरी विद्यार्थी वसतिगृहास अन्नधान्य तसेच आर्थिक मदत 

-सोशल मीडियाच्या माध्यमातून सातारकर जिवलग प्रेमी या नावाने गेल्या सात वर्षापासून एकत्र येऊन सामाजिक क्षेत्रात मदतीचे योगदान देत असणाऱ्या सोशल मीडिया ग्रुप ने यशोधन अनाथ आश्रम तसेच गगनगिरी विद्यार्थी वसतिगृह याठिकाणी भेट देऊन जीवनावश्यक वस्तू तसेच शालेय साहित्य तसेच आर्थिक स्वरूपात मदत देऊन त्यांच्या कार्याला हातभार लावला असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे 

             या सोशल मीडिया समूहाचे सदस्य कामानिमित्त मुंबई पुणे सातारा इतरत्र ठिकाणी कार्यरत असून वर्षातून एकदा सर्व एकत्र येऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत असतात यातूनच त्यांनी यावर्षी महंत आबांनंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महायोगी गगनगिरी विध्यार्थी वसतिगृह कापसेवाडी ता जावली याठिकाणी शालेयपयोगी साहित्य मदत करण्यात आली तसेच वाई तालुक्यातील यशोधन अनाथ आश्रम वेळे ता. वाई या ठिकाणी दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. या कार्यक्रमास भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील , यशोधन ट्रस्टचे रवी बोडके,तसेच सातारकर जिवलग प्रेमी सर्व सदस्यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. 

          यावेळी बोलताना रवी बोडके म्हणाले सध्या सोशल मीडिया चा वापर हा फक्त मनोरंजन करण्यासाठी केला जातं असून वेळेचा अपव्यय यातून मोठ्या प्रमाणात होतो आहे युवा पिढी याच्या आहारी गेली आहे मात्र सातारकर जीवलग प्रेमी यांनी या सोशल मीडियाचा समाजासाठी चांगला वापर केला असून त्यांच्या कार्याची सर्वांनी दखल घेतली पाहिजे असं त्यांचे कार्य आहे .भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील म्हणाले, युवा वर्गाकडून आजच्या जमान्यात सामाजिक कार्याची आवड जोपसले जाणे हे निश्चित उल्लेखनीय असून यापूढे देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया द्वारे त्यांनी जनजागृती करीत अन्य लोकांना यात सामावून घेत कार्य पुढे घेऊन गेले पाहिजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज पिसाळ तर आभार दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट 

Post Views: 89 बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट  सातारा -महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाची यात्रा म्हणजे वाई

Live Cricket