साताऱ्यातील पहिले एसी ॲबॅकस क्लासरूम तामजाई नगर, सातारा येथे सुरु
सातारा : तामजाई नगर, सातारा येथे ‘सक्सेस ॲबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रा. लि.च्या नव्या सेंटरचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गणित विषयातील भीती दूर करून आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने हे सेंटर सुरू करण्यात आले असून परिसरातील पालक व विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सातारा येथील वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक श्री. मनोज जाधव उपस्थित होते.संस्थेचे चेअरमन किरण पाटील , तसेच विद्यमान नगरसेवक श्री. सुधाकर यादव, ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाळासाहेब ढेकणे, प्रा. गंगाधर फडतरे, ऑडिटर श्री. संजय फडतरे, नगरसेवक श्री. बबनराव इंदलकर पाटील, श्री. दीपक फडतरे, श्री. गोपी फडतरे व श्री. अनिकेत फडतरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नवीन सेंटरचे विधिवत उद्घाटन करण्यात आले
आपल्या मनोगतात मनोज जाधव यांनी ॲबॅकस शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ॲबॅकस पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची गणिती क्षमता, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढतो. ४ लेव्हल मध्ये शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमाची रचना या संस्थेने केली आहे हे कौतुकास्पद आहे. स्पर्धेच्या माध्यमातून १ लाख रु स्कॉलरशिप देणारी हि एकमेव संस्था आहे. हि बाब विद्यार्थ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन श्री. किरण पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या नव्या सेंटरमुळे तामजाईनगर परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण ॲबॅकस शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. तामजाई नगर येथील हे सेंटर अत्याधुनिक सुविधा असलेले असून एसी क्लासरूमसह सुसज्ज असे या परिसरातील पहिलेच ॲबॅकस सेंटर आहे. विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी येथे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.असे प्रतिपादन त्यावेळी त्यांनी केले.
सेंटरच्या संचालिका सौ. श्वेता फडतरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सेंटरच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे व अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध, दर्जेदार व सातत्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी करून पालकांनी सेंटर ला भेट द्यावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास तामजाई नगर व परिसरातील पालक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती 9404646893 / 7666410283 व फ्रेंचायझी संदर्भातील चौकशीसाठी 8888561670 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन संचालिका श्वेता फडतरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गंगाधर फडतरे यांनी केले.



