सातारचे भूमिपुत्र प्रा.डॉ. दीपक ताटपुंजेची जागतिकस्तरावर झेप .
प्रा.डॉ.दीपक ताटपुंजे यांची उद्योजकीय कौशल्ये प्रशिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी, जागतिकस्तरावर गौरविले
सातारा – शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास लाभलेल्या सातारच्या ऐतिहासिक भूमीत विविध क्षेत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे असंख्य रत्ने उदयाला आली या रत्नांनी सातारच्या भूमीचे नाव सात समुद्र पलीकडे पोहोचविले आहे कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान ,शिक्षण, उद्योग क्षेत्राबरोबरच संशोधन क्षेत्रात ही जागतिक स्तरावरून उत्तुंग कामगिरी करून या भूमीचे नांवलौकिक वाढविला. सातारचे भूमिपुत्र व सध्या जागतिक स्तरावर विविध संस्थेशी निगडित असणारे डॉ. दीपक ताटपुंजे यांच्या संशोधनात्मक व उद्योजकीय कौशल्ये विकास कार्यप्रणालीचा गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी घेतलेला एक आढावा..
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण विश्वात झपाट्याने सर्व क्षेत्रात बदल घडत आहेत विशेषता उद्योजकीय क्षेत्रात नवीन क्रांती घडत आहे त्यामुळे या क्रांतीला सामोरे जाण्यासाठी कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीची नितांत गरज भासू लागली आहे त्यामुळे देशांतर्गत व जागतिक स्तरावरील शैक्षणिक धोरणात मोठे बदल घडत आहेत खुल्या अर्थव्यवस्था धोरणामुळे उद्योजकीय क्षेत्र हे अधिक व्यापक झाले आहे त्यामुळे रोजगार व स्वयंरोजगाराची संधी तरुणाईला आता प्राप्त होत आहे रोजगार व स्वयंरोजगार बाबत देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन कौशल्ये विकासावर आधारित शिक्षण प्रणालीचा अवलंब नव्या शैक्षणिक धोरणात केला आहे देशांतर्गत याबाबत कार्य करणाऱ्या विविध संस्था बरोबरच उद्योजकीय कौशल्ये विकासाचा प्रसार व प्रचार करणाऱ्यांना पाठबळ दिले जात आहे त्यामुळे देशांतर्गत या कार्याला पाठबळ लाभत आहे स्किल बेस्ड एज्युकेशन या कार्यक्रमाचा स्वीकार सातारचे भूमिपुत्र प्रा. डॉ. दीपक ताटपुंजे यांनी मागील पंचवीस वर्षापासून सातत्याने करीत आहेत उद्योग विश्वाला आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी ते मोलाचे कार्य करीत आहेत.
प्राध्यापक ते डॉक्टर पर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास थक्क करणार आहे प्रतिकूलतेवर मात करीत सातारा सारख्या छोट्या शहरातून सुरू केलेला प्रवास आज जगाच्या नकाशावर त्यांनी पोहोचविला आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय त्यांनी मांडलेले प्रगल्भ विचार व त्यांनी केलेल्या संशोधनात्मक कार्याची दखल नामवंत विद्यापीठांनी घेऊन त्यांच्या नावीन्यपूर्ण संशोधनात्मक व उद्योजकीय कौशल्याचा उचित गौरव केला आहे आजपर्यंत असंख्य शोधनिबंध त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत अमेरिका सारख्या प्रगत देशातील विद्यापीठांनी त्यांची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमिटीमध्ये त्याना सहभागी करून घेतले आहे यावरून त्यांच्या ज्ञान कौशल्ये व संशोधन क्षेत्रातील उंची समजून येते सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या प्रा डॉ दीपक ताटपुंजे यांनी विविध विषयावर विपूल लेखन करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे अनेक पुरस्कारचे मानकरी ठरलेल्या प्रा. डॉ. दीपक ताटपुंजे यांचा प्रत्येक सातारकर नागरिकांना अभिमान वाटतो त्यांची अमेरिकेतील मँसेच्युसेटस येथील उद्योजकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या बॅबसन कॉलेजच्या सुप्रतिष्ठत बॅबसन रिसर्च फेलशिप साठी निवड झाली सामाजिक उद्योजकता ग्रामीण क्षेत्रातील युवकांसाठीची उद्योजकता कौशल्ये आणि सर्व समावेशक उद्योजकता कौशल्ये याबाबत सखोल संशोधन केल्याबद्दल त्यांची विशेष निवड करण्यात आली त्याचबरोबरच साताक्लारा विद्यापीठाच्या मिलर सोशल आञपुनरशिप सेंटरचे ते मार्गदर्शकाची ही संधी मिळाली आहे. या माध्यमातून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची नवी संधी मिळाली आहे त्यांना मिळालेल्या संधीतून त्यांनी तरुणांना नवीदिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत आहेत त्यांचे या क्षेञीतील उचित कार्यामुळे त्यांची युरोपियन कमिशनच्या विषयतज्ञ पदी निवड झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅअॅलिस्ट 2030 या युनायटेड नॅशनन्सच्या 17 शाश्वत विकास उद्दिष्टे सध्या करण्यासाठीच्या विषयतज्ञ कार्यगटाचे ते सहयोगी सभासद आहेत त्यांचे या क्षेत्रातील उत्तुंग भरारी संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरेल असा या क्षेत्रातील तज्ञाचे मत आहे. प्रा. डॉ. दीपक ताटपुजे यांनी या क्षेत्रातील नविण्यपूर्ण कार्य अखंडितपणे पुढे घेऊन या क्षेत्राला नवी दिशा प्राप्त होईल असा विश्वास देशवासियाना आता वाटू लागला आहे.नुकतेच अमेरिकेतील ङेलावेअर युनिव्हर्सिटीबरोबर एंटरप्रेन्युअरशिप प्रॅक्टिकम कोर्स 2024साठी कोलोबोरोटिव्ह आॅनलाईन इंटरनॅशनल लर्निग करीता पार्टनर आॅर्गनायझेशन म्हणून डॉ. दीपक ताटपुंजे यांचा समावेश झाला आहे त्यांच्या या अलौकिक कार्याचा सार्थ अभिमान वाटत आहे सातारचा भूमिपुत्र आज जागतिक स्तरावर झेपविताना त्याचे अथक परिश्रम त्याग व निरपेक्ष भावनेतून ते सामाजिक परिवर्तनासाठी करीत असलेले कार्य निश्चित नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे
– उद्योजकतेचे तंत्र कौशल्ये अधिक विकसित करून ग्रामीण व शहरी भागातील तरुणाईला नवी उत्कर्षाची दिशा देऊन आत्मनिर्भार बनवणारे सातारचे प्रा. डॉ. दीपक ताटपुंजे गेली अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहेत शासनाच्या विविध योजना व त्या अंतर्गत असणारे उपक्रम हे आता सातत्याने समाजापुढे घेऊन प्रा डॉ दीपक ताटपुंजे यांनी ग्रामीण शहरीभागातील तरुणाईला उद्योग व्यवसायासाठी प्रवृत्त केले आहे ही चळवळ त्यांनी व्यापक केल्याने देशांतर्गत असंख्य तरुणाईला याचा लाभ झाला आहे त्यांच्या आजवर कार्याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील घेतली आहे विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत.
श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी
गौरीशंकर नाॅलेज सिटी लिंब सातारा