सातारच्या चवीचा ‘चंद्र विलास’ आता सांगलीत
साताऱ्यातील सुप्रसिद्ध ‘चंद्र विलास’ रेस्टॉरंट आता सांगलीतही आपली चवदार परंपरा घेऊन दाखल झाले आहे. वसंत शेठ जोशी परिवाराच्या ‘चंद्रविलास भवन रेस्टॉरंटची नवीन शाखा सुरु झाली असून, सांगलीकरांना आता साताऱ्याच्या खास खाद्यसंस्कृतीचा आस्वाद स्वतःच्या शहरातच घेता येणार आहे.
‘चंद्र विलास’ हे गेल्या अनेक दशकांपासून साताऱ्यातील लोकप्रिय नाव आहे. महाराष्ट्रीयन नाश्ता, साउथ इंडियन पावभाजी ज्यूस, सॅन्डविच तसेच दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिसळ व पुरिभाजी यासाठी हे रेस्टॉरंट विशेष ओळखले जाते. साताऱ्यातील रहिवासी तसेच बाहेरील पर्यटकांच्या जिभेवर राज्य करणारी ही चव आता सांगलीत पोहोचली आहे.
संजय भोकरे यांच्या शुभहस्ते रेस्टॉरंट चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राहुल रोकडे, वसंतशेठ जोशी,डॉक्टर महेश शहा, सौ.नमन शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी स्थानिक मान्यवरांची उपस्थिती होती. रेस्टॉरंट व्यवस्थापनाने सांगलीकरांना उत्तम सेवा व दर्जेदार पदार्थांची हमी दिली आहे. सकाळ पासून संध्याकाळी पर्यत नाश्त्याच्या विविध स्वादिष्ट मेन्यू येथे उपलब्ध राहणार आहेत.
सांगलीत नवीन सुरू झालेल्या या शाखेमुळे खाद्यप्रेमींसाठी एक नवे आकर्षण निर्माण झाले असून, साताऱ्याच्या चवीचा आनंद आता कृष्णाकाठच्या शहरातही अनुभवता येणार आहे.
