सातारा सज्जनगड रोडवर भीषण अपघात 2 ठार
सातारा : अंबवडे खुर्द ता. सातारा येथे रविवारी सकाळी पीकअप व दुचाकीचा भीषण अपघात होवून दोन 16 वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. वेदांत शरद शिंदे व प्रज्वल नितीन किर्दत (दोघे रा. अंबवडे खुर्द) अशी ठार झालेल्यामुलांची नावे आहेत. दोन्ही युवकांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ होत आहे. दरम्यान, राहूल भरत देवरे (वय 28, रा. सायळी पो. दहिवड ता. सातारा) हा युवक जखमी झाला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सकाळी 11 वाजता हा अपघात झाला आहे. अंबवडे खुर्द येथून पिकअप चालक पांडूरंग विठ्ठल गावडे (वय 42, रा. भेंडवाडी पो. आसनगाव ता. सातारा) हा मार्बल, ग्रानाईड घेवून निघाला होता. दोन्ही वाहने अंबवडे खुर्द आल्यानंतर भीषण अपघात झाला. यावेळीदुचाकीवरील दोन्ही मुले उडून पडली व गंभीर जखमी झाली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थघटनास्थळी धावले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र गंभीर जखमी मुलांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
