सातारा शहरातील एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर हल्लाप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले
सातारा -सातारा शहरातील एकतर्फी प्रेम प्रकरणातल्या एक तरुणाचा धक्कादायक आणि व्हिडिओ व्हायरल (Viral video) झाल्यानंतर साताऱ्यातील पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. अल्पवयीन शाळकरी मुलीला जबरदस्तीने पकडत, तिच्या गळ्याला सुरा लावून एका सनकी आशिकने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं, सुदैवाने एका सुज्ञान नागरिकाने याने पाठिमागून येत या माथेफिरू तरुणाच्या हातातील चाकू काढून घेत मुलीची सुटका केली. त्यानंतर, परिसरातील नागरिकांना या तरुणास पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित युवक हा अल्पवयीन नसून 18 वर्षे पूर्ण असल्याने त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या शिवानी कळसकर यांनी देखील पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त करत परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
