Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा शहरातील तुंबलेले ओढे रोगराईला निमंत्रण

सातारा शहरातील तुंबलेले ओढे रोगराईला निमंत्रण

सातारा शहरातील तुंबलेले ओढे रोगराईला निमंत्रण

सातारा -ओढ्यात दूषित पाणी  जीव जंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सातारा शहरातील तुंबलेले ओढे रोगराईला निमंत्रण देत असून ओढ्यातील दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे सातारा शहरातील वाढती नागरी वस्ती मुळे ठिकठिकाणीच्या ओढ्यात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे व वेली उगवली असून त्यात नागरिकांनी टाकलेला कचऱ्याची भर पडत असून त्यामुळे ओढ्यातील पाणी दूषित झाले असून ओढ्याला प्रदुषणाचा विळखा पडला आहे.

शहरातील अनेक ओढ्यात रासायनिक द्रव मिसळल्याने ओढ्यातील पाणी दूषित झाले आहे परिणामी जीवंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे दिसून येत आहे पावसाळ्यापूर्वी हे ओढे स्वच्छ होणे अत्यंत गरजेचे आहे सातारा नगरपालिकेने याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे नागरिकांच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे.. चौकट सातारा शहराच्या सर्वांगीण प्रगती बाबत सातारचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे मोठे योगदान राहिले आहे जवळपास 1000 कोटी पेक्षा अधिक विकास कामे त्यांनी करून दाखवले आहेत. सातारकर यांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांना विकास कामाची जाण असल्याने हा प्रश्नही ते निकाली काढतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

सातारा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे लोकसंख्येच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय नगरपालिकेने घेणे आवश्यक आहे विशेषता स्वच्छतेबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे याबाबत नगरपालिके प्रशासनाने शहराच्या विविध भागात घंटा गाड्यांची सोय केली आहे तरीही काही नागरिक जाणीवपूर्वक आपल्या घरातील कचरा हे ओढ्यात टाकत आहेत परिणामी ओढे तुंबत असून तेथे जीव जंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून नागरिकांच्या आरोग्यास ते घातक ठरत आहे.

श्रीरंग काटेकर सातारा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्री कारखान्याला यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव देणार आमदार मनोज घोरपडे यांची चरेगावच्या सभेत घोषणा

Post Views: 44 सह्याद्री कारखान्याला यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव देणार आमदार मनोज घोरपडे यांची चरेगावच्या सभेत घोषणा उंब्रज(प्रतिनिधी) ज्या सह्याद्री

Live Cricket