सातारा शहरातील ब्रिटिशकालीन लकडी पूल वाहतुकीसाठी धोकादायक
पुलाचे रुंदीकरणासह संरक्षण भिंतीचे उंची वाढवणे गरजेचे
सातारा-सातारा शहरातील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने जुन्या पूलाचे नूतनीकरणाची मोहीम सातारा नगरपालिकेने हाती घेतली आहे यासाठी विविध शासकीय योजनेतील निधीच्या माध्यमातून या पूलाचे कामे गतिमानतेने सुरू आहेत. सातारा शहरातील अनेक पूलाचे कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये सातारा शाहूपुरी मार्गावरील कोटेश्वर पूल वाहतुकीसाठी आता खुला झाला आहे. तर बदामी विहीर गडकर आळी येथील पुलाचे काम ही मार्गे लागले आहे तसेच आर्याग्ल महाविद्यालय व आय.टी.आय रोडवरील पुलाचे काम गतिमान झाले आहे .तर काही पूल कामाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये माची पेठ येथील अरुंद पूल तसेच ब्रिटिशकालीन असलेला बुधवार पेठेतील लकडी पूल यांचा समावेश आहे .सध्या लकडी पुलाची दयनीय स्थिती झाली असून या पुलाच्या रुंदीकरणाबरोबरच संरक्षण भिंतीचा विषय ही गंभीर झाला आहे. सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व वाहनाची व नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात असलेल्या लकडी पूल सध्या धोक्याचे व अपघाताचे केंद्र बनू पाहत आहे. पाचशे एक पाटी ते थोर स्वातंत्र्यसैनिक इस्माईल नूर मोहम्मद हकीम चौक मार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षण भिंती रस्त्याच्या मानाने कमी उंचीच्या झाल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांसाठी ते अत्यंत धोकादायक ठरू पाहत आहे .
या भागात विशेषता बुधवार पेठेतील वाढलेली नागरी वस्ती बरोबरच या मार्गावरून मोळाचा ओढा, एसटी स्टँड कडे ये जा करणाऱ्या प्रवासांना हा मार्ग सोयीचा असल्याने असंख्य वाहन चालक या लकडी पुलाचा वापर करतात. या पुलाचे रुंदीकरण व सुरक्षित प्रवासाचा मार्ग खुला करावा अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागले आहे.
ब्रिटिशकालीन लकडी पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असताना याकडे संबंधित यंत्रणेचे होत असलेले दुर्लक्ष गंभीर आहे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे या पुलावरून वाहन चालकांना वाहने चालवणे अत्यंत कठीण झाले असून अरुंद पुलामुळे वाहन चालक त्रस्त आहेत.
ब्रिटिशकालीन लकडी पूल वाहतुकीसाठी व नागरिकांसाठी धोकादायक ठरत असताना या पुलाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. वाहनांची संख्या वाढल्याने व नागरिकांची ये जा या पुलावरून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अन्य पुलांप्रमाणेच या पुलाचेही नूतनीकरण नगरपालिकेने हाती घ्यावे या पुलावरून अनेक वाहनांची संरक्षण भिंतीला धडक झाले असून काही भाग तुटलेला आहे या मार्गावरून विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची ये जा ही मोठ्या प्रमाणात असल्याने भविष्यातील धोके टाळण्यासाठी या पुलाचे रुंदीकरण अथवा नूतनीकरण करावे.
श्रीरंग काटेकर सातारा
