उद्योजक अमर आनंद कोल्हापूरे यांना‘ सातारा प्राईड’ पुरस्कार प्रदान
सातारा प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी हॉटेल सदगुरु, सातारा येथे सायंकाळी ठीक 8 वाजता सातारा न्यूज मीडिया वतीने दिला जाणारा सातारा प्राईड पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यंदाच्या वर्षीचा पुरस्कार वाई येथील प्रसिद्ध युवा उद्योजक, उत्कर्ष पतसंस्था वाई संचालक अमर आनंद कोल्हापुरे यांना ‘सातारा प्राईड ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ.प्रीती अमर कोल्हापुरे यांची उपस्थिती होती.अमर कोल्हापुरे यांनी वाई शहरांमध्ये अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाद्वारे आपले वेगळेपण जपले आहे. त्याचबरोबर अनेकांना उद्योगातून रोजगार देण्याचे महत्वपूर्ण कार्य ते करत आहेत. सहकारात काम करत असतानाच व्यवसाय उद्योगातही सचोटीने ते कार्य करत आहेत.
व्यवसाय लहान आहे, की मोठा, असा विचार न करता वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि परिणामकारक सेवा या त्रिसूत्रीच्या जोरावर ग्राहकांचे समाधान केल्यास नक्कीच यश मिळते, यावर अमर कोल्हापुरे साहेबांचा भर आहे. प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत, असा सल्ला ते नेहमीच तरुणांना देतात.
पुरस्कार वितरण समारंभास प्राथमिक शिक्षक बँक अध्यक्ष किरण यादव साहेब, चंद्रविलास उद्योग समूहाचे प्रमुख वसंतशेठ जोशी, उद्योजक बाळासाहेब जगदाळे, उद्योजक सागर भोसले, उद्योजक संतोष जाधव, श्रीरंग काटेकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार जयंत लंगडे यांनी केले. तर अली मुजावर यांनी आभार मानले.