सातारा (अली मुजावर )-मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात खासदार शिवसेनेचाच असणार यासाठी पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या या आग्रही भूमिकेला जिल्ह्यातील जनतेकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याने जिल्हा शिवसेनेत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वात गावोगावी शिवसेना वाढविण्यात पुरुषोत्तम जाधव आघाडीवर होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळावा यासाठी पुरुषोत्तम जाधव आग्रही असून जिल्ह्यातील शिवसैनिक ही तसे बोलून दाखवत आहेत. सर्वसामान्य आणि वारकरी कुटुंबातील असणारे पुरुषोत्तम जाधव निश्चितच सातारासाठी योग्य उमेदवार असल्याचे शिवसैनिकांकडून सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सकारात्मक वातावरण आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी केलेल्या निर्धारा मुळे ‘अभी नही तो कभी नही’ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करीत साताऱ्याची जागा आपण लढवू, असा शब्द पुरुषोत्तम जाधव यांना दिल्याचे समजते. नुकतेच पुरुषोत्तम जाधव यांनी भाजप नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सातारा लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच खासदार असणार यासाठी ते प्रचंड आग्रही आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार पुरूषोत्तम जाधव यांनीही तयारी सुरू केली आहे. सातारा लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच असल्याने लोकसभेला कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार पुरूषोत्तम जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
