सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी
सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील 7 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.शाहू स्टेडियम सातारा येथे दिनांक 11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या जिल्हा शालेय बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे वय वर्षे 14 या वयोगटातील यश भगवान निकम, संस्कार मोटे व सिद्धार्थ खामकर हे तीनही विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
तसेच 17 वर्षाखालील वयोगटातील मुलांमध्ये समर्थ खामकर व समशेर शिंदे हे अजिंक्य ठरले व त्यांनाही सुवर्णपदक मिळाले.तसेच मुलींमध्येही 17 वर्षाखालील गटातील मुलींमध्ये श्रीपतराव पाटील हायस्कूलची भाविका भरत जाधव हिनेही सुवर्णपदक जिंकून श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.तसेच दिव्यांश डुबल, आर्यन भोसले व सार्थक गिरी या विद्यार्थ्यांनी रौप्य पदकाला गवसणी घातली; तर प्रणव निकम आणि भक्ती जाधव हे कास्यपदक विजेते ठरले.
त्यांच्या या यशामध्ये शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील यांची प्रेरणा आणि प्रशिक्षक श्री सागर जगताप सर यांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या या याच्याबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा सौ वत्सला डुबल, उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप, जगन्नाथ किर्दत, सचिव तुषार पाटील, चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण ,सर्व संचालक, संस्था सदस्य ,पर्यवेक्षक श्री यशवंत गायकवाड, सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले व विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
