प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सातारा जिल्ह्यासाठी 45 हजार 422 घरकुलाचे विक्रमी उद्दिष्ट – धैर्यशील कदम( जिल्हाध्यक्ष भाजपा सातारा )
सातारा – प्रधानमंत्री आवास योजना हा केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम असून समाजातील गरीब व भूमिहीन घटकांना स्वच्छ हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि त्यांचा विभाग अहोरात्र प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यानंतरच 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे. या आराखड्यानुसार राज्यामध्ये 20 लक्ष घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
तर सातारा जिल्ह्यासाठी ग्रामविकास विभाग मार्फत 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यासाठी 45,4002 एवढ्या मोठ्या संख्येने घरकुलाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. घरकुलासाठी एक लाख 58 हजार 730 रुपये मिळणार आहेत. 100 दिवस कार्यक्रमांतर्गत तत्काळ मंजुरी देऊन पहिला हप्ता वितरित करून कामे सुरू करण्याच्या सूचना मंत्री महोदय जयकुमार गोरे यांनी प्रशासनात दिल्या आहेत. अशी माहिती सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. विश्रामगृह सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुकाध्यक्ष महेश गाडे, रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमरावकाका पाटील, कराड दक्षिण अध्यक्ष धनंजय पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, कोरेगाव अध्यक्ष संतोषआबा जाधव, कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते.
