सातारा हॉस्पिटल’च्या आरोग्य तपासणी शिबिरास कुमठयात प्रतिसाद
सातारा, दि. २३ : सातारा हॉस्पिटल अँड सातारा डायग्नोस्टिक सेंटरच्या सहकार्याने कुमठे (ता. कोरेगाव) येथे झालेल्या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे २०० स्त्री-पुरुषांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
सातारा हॉस्पिटल अँड सातारा डायग्नोस्टिक सेंटर तसेच एम.डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट यांच्या विद्यमाने व शरद पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष संजना जगदाळे यांच्या सहकार्याने कुमठे (ता. कोरेगाव) येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. शिबिरात कन्सल्टिंग फिजिशियन अँड डायबेटॉलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय मोरे, त्यांच्या सहकाऱ्यांनी कुमठे ग्रामस्थांची नेत्र तसेच आरोग्य तपासणी केली. रक्त शर्करा तपासणी, रक्तदाब तसेच जनरल चेकअप करण्यात आले. सुमारे २०० ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संगीता साळुंखे, डॉ चिवटे, कोरेगाव सातारा हॉस्पिटल व सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत देशमुख, किशोर पवार, सेवानिवृत्त सुभेदार मेजर गवळी, डॉ. प्रियंका माने, भारती काळंगे, डॉ. सुहासमहाराज फडतरे, अविनाशमहाराज जगदाळे तसेच कुमठे ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरेगाव : आरोग्य विषयक जागृतीसाठी राबवण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरास कुमठे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
