Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा: ध्यास फाउंडेशन सातारा आयोजित महिला उत्सव रन 2025

सातारा: ध्यास फाउंडेशन सातारा आयोजित महिला उत्सव रन 2025 

सातारा: ध्यास फाउंडेशन सातारा आयोजित महिला उत्सव रन 2025 

महिला दिनाचे औचित्य साधून एक धाव स्व सामर्थ्यासाठी असा नारा देत महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली एक धाव म्हणजे महिला उत्सव रन होय. ध्यास फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. वैजयंती ओतारी यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. महिला उत्सव रन ची सुरुवात दोन मार्च 2025 ला सकाळी सहा वाजता शाहू स्टेडियमवर होईल . यामध्ये तीन किलोमीटरसाठी फन रन व सात किलोमीटर साठी स्पर्धा आयोजित केल्या तीन किलोमीटरसाठी वयाची अट नाही पण सात किलोमीटर साठी चार वयोगट केले आहेत. पहिला वयोगट आहे 14 ते 24 दुसरा 25 ते 40 तिसरा 41 ते 55 व चौथा 56 ते पुढील. प्रत्येक वयोगटामध्ये प्रथम क्रमांक रुपये 5000 द्वितीय क्रमांक रुपये 3000 व तृतीय क्रमांक रुपये 2000 याबरोबरच ट्रॉफी, सई कलेक्शन तर्फे 500 रुपयांचं गिफ्ट व्हाउचर व रुहा डिजिटल यांच्यातर्फे एक वर्षासाठी डिजिटल ग्रीटिंग कार्ड देण्यात येणार आहे.

ही रन महिलांच्या शारीरिक  मानसिक सक्षमीकरणाकरता आयोजिली आहे.‌ या रंगला महिला उत्सव असे नाव देण्यात आले आहे कारण सर्व वयोगटातील महिला एकत्रित येऊन स्वतःच्या क्षमतेची चाचपणी करणार आहेत. १ मार्च 2025 रोजी सायंकाळी किटस वाटप बरोबर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आनंदीता या स्वयंसेवी संस्थेतर्फे रक्तगट, हिमोग्लोबिन व साखर तपासणी होणार आहे. तरी सर्व महिलांनी महिला उत्सव रन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ध्यास फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 521 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket