सातारा सी. ए. संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड उत्साहात
केळघर प्रतिनिधी: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत आहे उद्योग व्यवसाय वाढीस लागल्यामुळे आयकर विभागाचे काम सोपे व्हावे यासाठी सी.ए. हे महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात .सातारा सी.ए. संघटनेच्या वतीने सन २०२५- २९ या कालावधीसाठी सी.ए. संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड उत्साहात करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे: अध्यक्ष: सी.ए. मंगेश प्रकाश प्रधान, उपाध्यक्ष: सी.ए .जोहेब नासीरहुसेन मुलाणी, सचिव: सी.ए .सुमित किरण कदम, खजिनदार: सी.ए. स्वप्नील अशोक भोसले व सदस्य: सी.ए. तानाजीराव जाधव, सी.ए. निखिल ओसवाल यांची कार्यकारणी पुढील पाच वर्षांमध्ये कामकाज पाहणार आहेत.
या विशेष प्रसंगी ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट सी.ए. शामराव गीते, सी.ए. अतुल दोशी, सी.ए. धीरज कसट, सी.ए. सौरभ लाहोटी, सी.ए. विनोद सावंत, सी.ए. रियाज मोमीन,सी.ए. जीवन जगताप, सी.ए. रामदास कामठे,सी.ए. जयसिंग चव्हाण आणि सी.ए. सत्यजिराव भोसले यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
सी ए यांच्या व्यवसायातील बदल व भविष्यातील योजनांची रूपरेषा सादर करण्यात आली. सी.ए. व्यवसायातील नव्या संधी, टेक्नॉलॉजीचा प्रभाव, तसेच कार्यशाळा व सेमिनारच्या आयोजनावर भर देण्याचा निर्धार मान्यवरांनी व्यक्त केला. आगामी काळात ब्रँच चार्टर्ड अकाउंटंटसाठी अधिक उपयुक्त कार्यक्रम आणि प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येईल असे आश्वासन नवीन कार्यकारिणी दिलेले आहे.
