साताऱ्यात 20 सप्टेंबर रोजी इंजिनियर्स डे व व्यावसायिक प्रदर्शन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे आयोजन – १२०० उद्योजकांचा सहभाग अपेक्षित
सातारा प्रतिनिधी-सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट (Saturday Club Global Trust – SCGT) या मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या बिगर-नफा संस्थेमार्फत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस “इंजिनियर्स डे” म्हणून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भव्य इंजिनियर्स डे व व्यावसायिक प्रदर्शन झेडपी हॉल, सातारा येथे २० सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमाची थीम आहे – “साताऱ्याचा गौरवशाली अभियांत्रिकी वारसा”. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश व कर्नाटक या राज्यांतून तब्बल १२०० उद्योजक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. विविध औद्योगिक संघटना, आर्किटेक्चर व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, क्रिडाई, रोटरी क्लब तसेच सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर:
👉 ना.श्री. छ. श्री. शिंवेंद्रराजे भोसले
👉 आमदार महेश शिंदे
👉 उपजिल्हाधिकारी संतोष पाटील
👉 आय.ए.एस. अधिकारी याशीनी नागराजन
तसेच मार्गदर्शनासाठी –
इंजि. राहुल अहिरे (माजी कार्यकारी अभियंता, PWD)
इंजि. राजु जगताप (MD – INSTEEL Engg.)
आर्किटेक्ट. विलास अवचट (National President – Indian Institute of Architects)
औद्योगिक किर्तनकार पुष्कर औरंगाबादकर
आयोजन समिती:
कार्यक्रमाचे उद्घाटन मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, डेप्युटी सेक्रेटरी जनरल केदार साखरे व व्यबसाईड सेल हेड गिरीष घुगरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सातारा रिजन हेड सचिन कुंभार (मो. ९१७५९६२५६७) व व्यबसाईड सेल कोऑर्डिनेटर आर्किटेक्ट प्रतिक मालपुरे (मो. ७६२०८६२९८१) हे कार्यक्रमाचे समन्वयक आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून, इच्छुक नागरिक, अभियंते व उद्योजकांनी उपस्थित राहून या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
