Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबईतून हटणार नाही मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातून मोठा इशारा

सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबईतून हटणार नाही मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातून मोठा इशारा

सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबईतून हटणार नाही मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातून मोठा इशारा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले. मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतूकीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईतील अनेक भागात वाहतूककोंडी झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी आंदोलनाला परवानगी दिल्यामुळे सरकारचे आभार मानताना मनोज जरांगे पाटील दिसले. मात्र, यासोबतच त्यांनी थेट मोठा इशारा दिला आहे. आम्हाला अमरण उपोषणाची करण्याची परवानगी द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांना एकच दिवसाची उपोषणाची परवानगी दिली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हा माझा शब्द आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कोर्टाने परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी 20 अटी घालून या उपोषणाला परवानगी दिली आहे. मात्र, आजसाठीच ही परवानगी असणार आहे.

सरकारचे शिष्टमंडळ हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यामधून पर्याय निघू शकला नाही. जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये येण्यापासून रोखण्यात सरकारला अपयश मिळाल्याचे बघायला मिळतंय. आता काहीही झाले तरीही मागे हटणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 138 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket