कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » संत तुकारामांचे वैज्ञानिक गाथा दोहन ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

संत तुकारामांचे वैज्ञानिक गाथा दोहन ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

संत तुकारामांचे वैज्ञानिक गाथा दोहन ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

सातारा -वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंग गायनाने मंगलमय वातावरणात समारंभाची सुरवात झाली.लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या सभागृहात वाचस्पती प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के यांच्या शुभहस्ते ग्रंथांचे प्रकाशन पार पडले. याप्रसंगी डॉ.यशवंत पाटणे सरांनी ग्रंथाचे अंतरंग उघडून सांगितले. ते म्हणाले “धर्म हे अंतरंगाचे विज्ञान आहे तर विज्ञान हा सृष्टीचा धर्म आहे .परमेश्वर चराचरात आहे. तसा तो अंतर्यामी आहे. हे अंतिम सत्य संत तुकाराम सांगतात. हीच विज्ञान आणि धर्माची परस्परपूरक आणि प्रेरक भूमिका डॉक्टर बेंद्रे यांनी या ग्रंथात विशद केली आहे. हा ग्रंथ मनाला चेतना देणारा सुविचारांचा अमृतकुंभ आहे”

डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी पूर्ण ग्रंथांचे जणू रसग्रहणच केले. आपल्या ओघवती रसाळ वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाने या समारंभाचा कळसाध्याय गाठला. नर्म विनोदी शैलीत त्यांनी वेद ,उपनिषदे ,दर्शन शास्त्रे यातील गूढार्थातील सत्य विशद केले. या शास्त्रांचा संत तुकारामांनी आपल्या गाथेत केलेल्या प्रयोजनाचा अत्यंत सोप्या भाषेत उलगडा केला. तिनही दिग्गज वक्त्यांनी त्यांच्या अमृतवाणीने उपस्थितांना अभूतपूर्व मेजवानी दिली .याप्रसंगी एल.बी.एस्. चे विद्यमान प्राचार्य डॉक्टर मोहिते सर, प्राचार्य महेश गायकवाड सर ,प्राचार्य सुहास साळुंखे हे आवर्जून उपस्थित होते.

प्रारंभी डॉ सुधाकर बेंद्रे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथ लिखाणा मागील भूमिका विशद केली.डॉ.रूपाली बेंद्रे यांनी आभार मानले. आपल्या अभ्यासपूर्ण रसाळ वाणीतील सूत्र संचालनाने श्री. सुजित शेख यांनी अधिकच रंगत आणली.विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, विविध संघटनांचे पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket