Home » देश » धार्मिक » सकल जैन समाजाचा आक्रोश मोर्चा विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ, सातारा सकल जैन बांधव एकवटले

सकल जैन समाजाचा आक्रोश मोर्चा विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ, सातारा सकल जैन बांधव एकवटले

सकल जैन समाजाचा आक्रोश मोर्चा विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ, सातारा सकल जैन बांधव एकवटले

सातारा (अली मुजावर )-बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीर रित्या उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ हजारो सातारा सकल जैन समाजाच्या वतीने 24 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जैन समाजातील हजारो स्त्री-पुरुषांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासन कारभाराचा जाहीर निषेध केला.

विलेपार्ले, मुंबई येथील जैन मंदिरावरील बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ, सकल जैन समाज सातारा यांच्यातर्फे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. सातारा सकल जैन समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सातारा सकल जैन समाजाच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले आहे.यावेळी डॉ. श्री. विजय शहा (म्हसवडकर),श्री. समरथमल जैन,श्री. सुभाष ओसवाल,श्री. अजितशेठ मुथा यावेळी मोठ्या प्रमाणावर जैन समाज व पदाधिकारी उपस्थित होते.

‘या’ आहेत जैन समाजाच्या मागण्या?

विलेपार्ले येथील जैन मंदिरावर हल्ला व धर्माची विटंबना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करुन निलंबित करावे.

मंदिर पूर्व स्थितीत जसे होते तसे पुन्हा त्याच जागेवर बांधून त्याचे पुननिर्माण करुन ते जैनवासियांना सुपूर्द करावे.

समाजाच्या शुचितेसाठी कडक नियम करावे, जेणेकरुन पुन्हा इतरांनी जैन समाजाकडे गैर नजरेने पाहू नये व गैरवर्तन करु नये.

जैन धर्मस्थळांची व साधूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यात यावी व यासाठी संबंधित अधिका-यांना सूचित करावे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (रोहास), जिल्हा

Live Cricket