कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » ठळक बातम्या » सह्याद्रि साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोटामध्ये 3 ते 4 कर्मचारी गंभीर जखमी

सह्याद्रि साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोटामध्ये 3 ते 4 कर्मचारी गंभीर जखमी 

सह्याद्रि साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोटामध्ये 3 ते 4 कर्मचारी गंभीर जखमी 

कराड प्रतिनिधी – ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना स्फोट झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात घडली. या दुर्घटनेत गंभीररित्या भाजल्याने तीन ते चार कर्मचारी जखमी झाले आहेत. 

शैलेश भारती (वय 32 रा. उत्तर प्रदेश), अमित कुमार (वय 19 रा. बिहार), धर्मपाल (वय 19 रा.उत्तर प्रदेश) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत घटनस्थाळावरून मिळालेली माहिती अशी की, यशवंतनगर येथे सह्यादि सहकारी साखर कारखान्यात मागील पंधरा दिवसांपूर्वी ईएसपी बॉयलर बसविण्यात आला होता आणि त्याची टेस्टींग आठ दिवसांपासून सुरू होती.  

आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास टेस्टींग सुरु करण्याचे काम हाती घेण्यात आले. टेस्टिंग सुरु असतानाच येथील बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील इतर कामगार देखील भयभीत झाले. कामगारांनी तत्काळ स्फोट झालेल्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी टेस्टींगचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्याची त्यांनी पाहिले. त्यानंतर इतर कामगारांनी जखमी कामगारांना तत्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket