Home » ठळक बातम्या » सह्याद्री कारखान्यात परिवर्तन अटळ उंब्रज येथील सांगता सभेत आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला विश्वास

सह्याद्री कारखान्यात परिवर्तन अटळ उंब्रज येथील सांगता सभेत आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला विश्वास

सह्याद्री कारखान्यात परिवर्तन अटळ उंब्रज येथील सांगता सभेत आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला विश्वास

उंब्रज (प्रतिनीधी)- कराड उत्तरच्या जनतेने २५ वर्षात आपली काय क्षमता आहे हे बघीतले आहे. कारखाना कसा अडचणीत आणला हे सभासद जाणून आहेत. सभासद आता फक्त मतदान करण्याची वाट बघत असून स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेल पाच ते सात हजारांच्या मतांनी विजयी होईल असा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला. पंचवीस वर्षे नुसतं गुबू गुबू करून लोकांना झुलवायचं काम केले. साडेतीन महिन्यात हणबरवाडी धनगरवाडी सारखी योजना मार्गस्थ लावण्याचे काम केले. आपण कराड उत्तर मध्ये केलेले एक स्मरणात राहील असं काम दाखवून द्यावे असे आव्हान आमदार मनोज घोरपडे यांनी यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेल सांगता सभेत केले.

      उंब्रज ता.कराड येथील बाजारपेठेतील पटांगणात स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल सांगता समारंभ ते बोलत होते. यावेळी संपतराव जाधव, सुरेश पाटील, वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, मोहनराव माने, निवासराव निकम, प्रकाश पाटील, शरद चव्हाण, महेशकुमार जाधव, सरपंच योगराज जाधव, आत्माराम जाधव, सुभाष पाटील, गोपीनाथ पाटील अनेक मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    आमदार मनोज घोरपडे पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांना आम्ही शड्डू मारला नाही. आम्ही स्वार्थासाठी कधी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला नाही. चव्हाण साहेबांच्या पुतळ्याभोवती साखरेची पोती लावून आपण विटंबना केली. विधखनसभेला आम्ही तुम्हाला शड्डू मारला होता. सहा तारखेला पुन्हा एक फूट गुलाल टाकून पुन्हा एकदा शड्ड मारणार आहे. कारखान्याच्या सध्याच्या कारभारला कंटाळून सभासदांची इलेक्शन हाती घेतले आहे. आमदारकी गेल्यावर साखर मोफत करण्याचे का सुचले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कारखान्याचे इलेक्शन आले की उसाला दर देण्याची घोषणा करता मात्र साडेआठ हजार सभासद वारसांची नोंद आपण केली नाही. आमच्या हातात कारखाना आल्यानंतर कामगारांना न्याय देवून सभासदांना आज पर्यंतच्या इतिहासातील उच्चाकी दर देऊ. आपण कारखान्यावर कर्ज करून ठेवले ते फेडण्याची ताकद आमच्यात आहे. 

 वसंतराव जगदाळे म्हणाले, सह्याद्री साखर कारखाना चालवण्यासाठी आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले पॅनेल सक्षम आहे. कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून सभासदांचे प्रश्न आम्ही सोडवू. 

महेशकुमार जाधव म्हणाले, कारखान्यामार्फत पाणी पुरवठा संस्था चालवल्या जातात. त्यातील बऱ्याच संस्था बंद पडल्या काही अत्यवस्थ आहेत. उंब्रजची उमेश्वर पाणी संस्था भाऊंच्यामुळे बंद पडली नाही. त्याची जबाबदारी माजी आमदारांनी घ्यायलाच पाहीजे. संस्थाच्या प्रत्येक वार्षिक सभेला चेअरमन व्हाईस चेअरमन उपस्थित राहतात मग तुम्ही कशासाठी उपस्थित राहता. तसेच प्रत्येक संस्थेकडून वार्षिक तपासणी फी कशासाठी आकारता सवाल महेश कुमार जाधव यांनी केला.  

यावेळी अधिकराव शिंदे, राहुल शिवाजी यादव,बाजीराव भोसले, जगन्नाथ जाधव, वैभव साळुंखे, सुभाष पाटील , सचिन शिंदे, विकास आण्णा गायकवाड, गोपीनाथ पाटील, हणमंत साबळे, सचिन जाधव गणेश जाधव, कामगार नेते नवनाथ पाटील , नंदकुमार जगदाळे, संतोष वेताळ, वासुदेव माने,सुरेश पाटील, वसंतराव जगदाळे, विवेक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.     

गेली पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ आपण या संस्थेचे चेअरमन आहात.आज कारखाना अडचणीत आहे म्हणता. मंग हा कारखाना अडचणीत आणला कुणी तुम्हीच ना? या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याची, कामगारांना न्याय देण्याची व शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत नेऊन त्याला चांगला दर देण्याची क्षमता आमच्यात आहे.कारखाना कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या पाण्याच्या योजना नव्याने चालू करून शेतकऱ्यांना तीन आठवड्यामध्ये पाणी देण्यासाठी प्रयत्नशील राहून पाणी पट्टी सुद्धा कमी करणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे

Post Views: 19 तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे खटावचे सनशाईन स्कूल ठरले जिल्ह्यातील पहिले रोबोटिक

Live Cricket