Home » ठळक बातम्या » सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेचा २७१ कोटीचा संमिश्र व्यवसाय

सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेचा २७१ कोटीचा संमिश्र व्यवसाय

सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेचा २७१ कोटीचा संमिश्र व्यवसाय

सातारा प्रतिनिधी -सहकार क्षेत्रात सक्षम व आदर्श पतसंस्था म्हणून मा. राज्यपाल यांचे हस्ते “सहकार भूषण” पुरस्कार देवून गौरविलेल्या व गेली ३६ वर्षे अविरत सेवा देत असलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रु. २७१ कोटीचा व्यवसाय केला आहे. पारदर्शक कारभाराच्या जोरावर सन २०२४-२०२५ मध्ये संस्थेने ढोबळ नफा रु. ३ कोटी ८६ लाख मिळविला असून संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्याच्या उददेशाने संस्थेने सर्व कायदेशीर तरतूदी पूर्ण केल्या.

धन्वंतरी पतसंस्थेने आपल्या नियोजनबध्द कामकाजामुळे व सर्व सभासद, कर्जदार, ग्राहक, संचालक, सेवक यांचे सहकार्याने हे यश संपादन केले असल्याचे संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांनी सांगितले व याबददल त्यांनी सर्वाचे आभार मानून भविष्यातही असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, सेवकांनी व संचालकांनी ग्राहकांकडे प्रत्यक्ष भेटी देवून, फोनव्दारे सतत संपर्क ठेवला. ग्राहकांचेसुध्दा धन्वंतरीवर मनापासून प्रेम असलेमुळे काही कर्जदारांनी स्वयंप्रेरणेने कर्जखाती नियमित केली अशा सर्व कर्जदारांचा आम्हांला अभिमान वाटतो त्यांचे सर्वप्रथम मी संचालक मंडळाचे वतीने अभिनंदन करुन आभार मानतो तसेच व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी वर्ग या सर्वाच्या प्रयत्नांमुळे परिणामकारक कर्जवसुली झाली त्याबदद्ल त्यांचे विशेष अभिनंदन करतो.

संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले की, संस्था आपले कामकाज सहकार कायदा, नियम व मंजुर उपविधीमधील तरतूदी व नियामक मंडळाच्या आदेशानुसार करत आहे. सहकार खात्यांचे सर्व निकष, मानांकने इ. ची पूर्तता संस्था प्रत्येक वर्षी करतेच. यावर्षीसुध्दा ऑडीट गुणतक्त्यातील निकषांची पूर्तता संस्थेने पूर्ण केली असुन शासकीय लेखापरीक्षणानंतर संस्थेस सर्वोच्च असा ऑडीट वर्ग ‘अ’ निश्चितच मिळेल. संस्थेचे संचालक मंडळाने व्यावसायिक व्यवस्थापनाचे धोरण समोर ठेवून वेळोवेळी प्रभावीपणे निर्णय घेतले तसेच सर्व संचालक व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देउन संस्थेचा कारभार नियोजनबध्द करुन संस्थेची प्रतिमा समाजात उंचावली आहे. विशेष बाब म्हणजे संस्थेने या आर्थिक वर्षात रू. ५७ कोटी इतक्या रकमेचे सोने तारण कर्जवाटप केले आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखा संपूर्ण संगणकीकरणासह स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत आहेत. सभासद, ठेवीदार, कर्जदार, कष्टाळू सेवक यांचे सहकार्यानेच आपणांला हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले व याबद्दल त्यांनी सर्वाचे अभिनंदन केले व आभार व्यक्त केले. तसेच संस्थेने सभासदांकरीता गृहबांधणी, सोने तारण व वाहन खरेदी कर्ज योजनेस ८.७५% व इतर कर्ज योजनेकरीता ११% इतका अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहे.

सदर कर्जव्याजदराचा व सातारा शाखेमध्ये उपलब्ध असलेल्या लॉकर्स सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

सदरप्रसंगी व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, ३१ मार्च २०२५ अखेर संस्थेच्या ठेवी रु १५६ कोटी ३१ लाख इतक्या आहेत तसेच संस्थेने कर्जपुरवठा रु. ११४ कोटी ४२ लाख केला असून रु. ९७ कोटीची सुरक्षीत गुंतवणूक केली आहे. संस्थेचे स्वनिधी रु. ४५ कोटी ८३ लाख व खेळते भांडवल रु. २२२ कोटी ४४ लाख तसेच सरासरी सी.डी. रेशो ६५.४०% इतका तर सीआरएआर ३९.४३ %. इतका झाले असल्याचे त्यांनी सांगीतले. संस्थेने प्रत्येक घटकांत प्रगती केल्याबदद्ल सर्व सहकारी संचालकांचे व सेवक वर्गाचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह ७ शाखांमधून कृती आराखडयानुसार कामकाज करुन आवश्यक तेवढाच खर्च करुन काटकसरीचे धोरण राबविल्यामुळे व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण फक्त १.५४% इतके अत्यल्प राखले आहे. स्थापनेपासून अ वर्ग मिळकत आहे तसेच प्रतिवर्षी संस्था लाभांश देत आली आहे गतवर्षीही संस्थेने १०% लाभांश दिला आहे अशा अनेक बाबींमुळे लोकांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. तसेच संस्थेने सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित केल्यामुळे ग्राहक एसएमएस बँकीग, नेट बँकींग, एन.इ.एफ.टी. व आर.टी.जी.एस. सारख्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेत आहेत याचे समाधान वाटते. सहकार खात्याच्या नियामक मंडळाकडून वेळोवेळी मिळणा-या मार्गदर्शक परीपत्रकांचे व नियमांचे पालन करून स्पर्धात्मक बाजारपेठेत संस्था सक्षमतेच्या दृष्टीने संचालक मंडळ सतत जागरूक राहून व्यवस्थापन करत आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय यादवराव पवार यांनी पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन मा. संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने अचूक तयार करुन सर्व सेवकांचे सहकार्याने ते परीणामकारक राबविणार असल्याचे सांगून आभार मानले. याप्रसंगी संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. सुनिल कोडगुले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. नारायण तांबे, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. सौ. सारीका मस्कर, अॅड. सुर्यकांत देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिंगणे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला 

Post Views: 335 जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला  सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला

Live Cricket