रूरल हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनची धुरा डॉ ससाणे, डॉ गोवेकर आणि डॉ गुरव यांच्या खांद्यावर
सातारा -रूरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांची वार्षिक सभा सातारा येथे मावळते अध्यक्ष डॉ शंतनू पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे पार पडली.या सभेत सर्वानुमते असोसिएशनचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष म्हणून काम पाहणारे जीवनप्रकाश हॉस्पिटल, पाचवड, तालुका वाईचे डॉ मनोहर ससाणे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
हॉटेल लेक-व्ह्यू येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात अध्यक्ष म्हणून डॉ मनोहर ससाणे, उपाध्यक्ष म्हणून डॉ प्रताप गोवेकर, सचिव म्हणून डॉ सचिन गुरव, उपसचिव म्हणून डॉ श्रीकांत कदम, खजिनदार म्हणून डॉ विश्वजित बाबर तर उपखजिनदार म्हणून डॉ विकास फरांदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ शंतनू पवार यांची सल्लागार समितीवर निवड करण्यात आली.
हे सर्व पदाधिकारी तसेच त्यांच्याबरोबरच चाळीस नूतन डायरेक्टर्स यांचा संघटनेचे माजी संस्थापक अध्यक्ष डॉ सुधाकर बेंद्रे, डॉ मोहन सुखटणकर, रुबी हॉल क्लिनिक पुणे येथील ज्येष्ठ आणि तज्ञ डॉ श्रीकांत दलाल, डॉ संदीप मोरखंडीकर तसेच डॉ दुर्गेश मकवाना यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉक्टरांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना सोळा वर्षे काम करत आली आहे आणि इथून पुढेही सर्वांना बरोबर घेऊन काम करत राहू असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ मनोहर ससाणे यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी साताराचे जेष्ठ निवेदक श्री मिलिंद कामले यांनी केले. आभार डॉ प्रकाश कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक डॉ माणिक तसेच डॉ अभिजित थोरात यांनी यशस्वीपणे केले.
