ग्रामीण भागातील दिव्यांग मुलांना समाजामध्ये उभे राहण्यासाठी आपुलकी मतिमंद शाळेचे कार्य कौतुकास्पद – मंत्री मकरंद पाटील
वाई प्रतिनिधी –वाई तालुक्यातील पाचवड येथे आपुलकी दिव्यांग मुलांची शाळा गेली 23 वर्ष शासनाचे अनुदान नसताना या शाळेच्या संस्थापिका सुषमा पवार अहोरात्रपणे दिव्यांग मुलांसाठी व त्यांना समाजामध्ये उभे राहण्यासाठी रोजगार संधी उपलब्ध करून देत आहेत या आपुलकी मतिमंद शाळेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.
आपुलकी प्रौढ संमिश्र दिव्यांगाची निवासी कार्यशाळा लघुउद्योग व पुनर्वसन केंद्र पाचवड ता. वाई या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार सर, माजी जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, भुईज सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे, वाई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दत्ता शेठ बांदल सरपंच महेश गायकवाड अमृतवाडी सरपंच सचिन रत्नपारखे, आसले सरपंच सौ. सुप्रभा चव्हाण, पोलीस पाटील सौ. आरती मोरे, सहकार बोर्ड संचालक राजेंद्र सोनावणे, नवलाई पतसंस्था चेअरमन वसंतराव शेवाळे, विकास सेवा सोसायटी चेअरमन निलेश शेवाळे, सातारा जिल्हा खरेदी विक्री सह संचालक कांतीलाल पवार सुनील सहकारी कारखाना संचालक ज्ञानेश्वर शिंदे सह्याद्री शिक्षण संस्था संचलित आपुलकी प्रौढ दिव्यांगाचे अध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष मानसिंग चव्हाण सचिव साहेबराव पडवळ सुजाता धर्माधिकारी प्रकाश काटवटे दत्तात्रय सावंत संस्था कर्मचारी दिव्यांग पालक आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थापिका सौ. सुषमा पवार म्हणाल्या दिव्यांगाची कार्यशाळा या शाळेमध्ये कागदापासून बनवणारे प्लेट्स द्रोण पत्रावळी कागदी ग्लासेस पेपरच्या पिशव्या तयार केल्या जाणार आहेत यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे व या मतिमंद मुलाची आर्थिक परस्थिती सुधारण्यासाठी आपण सर्वांनी पुढे होऊन मदत करावी व हे साहित्य खरेदी करावे व या मुलांना समाजामध्ये उभे राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाचे आभार अनिल पवार यांनी मानले.
