रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे कौटुंबिक न्यायालय येथे सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न
महिलांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अभिनव उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत
कोल्हापूर: महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ करवीरने एक अभिनव उपक्रम राबविला आहे. रोटरी क्लब ऑफ करवीरने कौटुंबिक न्यायालय, कोल्हापूर येथे सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनचं उद्घाटन केलं. या उपक्रमाचा उद्देश महिलांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणं आणि त्यांना सॅनिटरी पॅड्स सहज उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा प्रदान करणं आहे.
उद्घाटन समारंभाला कौटुंबिक न्यायालय कोल्हापूरचे न्यायाधीश डॉ. प्रशांत अग्निहोत्री हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते वेंडिंग मशीनचा लोकार्पण सोहळा रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष कुशल पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ करवीरचे सेक्रेटरी नारायण भोई, ट्रेझरर निलेश भादुले तसेच प्रोजेक्ट चेअरमन स्वप्निल कामत यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक समाजसेवक उपस्थित होते. या योजनेमुळे महिलांना मासिक पाळीच्या वेळी आवश्यक असलेल्या सॅनिटरी पॅड्सची सुविधा सहजपणे उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक आराम सुनिश्चित होईल.
महिलांनी सामाजिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांनी आपल्या कष्ट, धडपण, आणि समर्पणाद्वारे विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन आणलं आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, आणि राजकारण यांसारख्या क्षेत्रांमध्ये महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिला स्वयंपूर्णतेच्या दिशेने जाऊन रोजगार क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. समाजातील पिढ्यान्पिढ्या असलेल्या रूढीवादाच्या विरोधात उभं राहून महिलांनी समान हक्कांसाठी संघर्ष केला आहे.त्यांच्या कार्यामुळे समाजात जास्त समानता, न्याय, आणि विकास साधला आहे. महिलांचे योगदान समाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये महत्त्वपूर्ण आहे, आणि ते सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत अत्यावश्यक आहे.
रोटरी क्लब ऑफ करवीरच्या नावीन्यपूर्ण तसेच सामाजिक प्रश्नांची उकल साध्य करण्याच्या अनुषंगाने नियोजलेल्या या उपक्रमामुळे महिलांच्या कार्यकर्तृत्वाप्रती आदर सन्मान व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सदरच्या सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन चा लोकार्पण सोहळा मधील अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष कुशल पटेल म्हणाले, आजचा हा सोहळा केवळ एका मशीनच्या लोकार्पणाचा नाही, तर समाजातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्याचा दिवस आहे. महिलांचे आरोग्य, विशेषतः मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता, हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असून, समाजात अजूनही त्याबाबत काही प्रमाणात जागरूकतेचा अभाव दिसून येतो.
रोटरी क्लब ऑफ करवीर, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून, नेहमीच समाजोपयोगी उपक्रम हाती घेत आले आहे. महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिनचा हा उपक्रम हाच त्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग आहे. या मशीनमुळे महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय स्वच्छता साधनं सहज उपलब्ध होतील.
महिलांनी सामाजिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांनी आपल्या कष्ट, धडपण, आणि समर्पणाद्वारे विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन आणलं आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, आणि राजकारण यांसारख्या क्षेत्रांमध्ये महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिला स्वयंपूर्णतेच्या दिशेने जाऊन रोजगार क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. समाजातील पिढ्यान्पिढ्या असलेल्या रूढीवादाच्या विरोधात उभं राहून महिलांनी समान हक्कांसाठी संघर्ष केला आहे.त्यांच्या कार्यामुळे समाजात जास्त समानता, न्याय, आणि विकास साधला आहे. महिलांचे योगदान समाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये महत्त्वपूर्ण आहे, आणि ते सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत अत्यावश्यक आहे.
कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात असलेली सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन महिला व न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींना उपलब्ध होईल. यामुळे महिलांना अत्यंत सोयीस्कर पद्धतीने वेंडिंग मशीनचा वापर करता येणार आहे.रोटरी क्लब ऑफ करवीरच्या या उपक्रमामुळे महिला सशक्तिकरण आणि आरोग्यविषयक योग्यतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आभार प्रदर्शन करताना स्वप्नील कामत म्हणाले महिलांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या शारीरिक स्वच्छतेसाठी एक महत्वाचा पाऊल रोटरी क्लबने उचलला आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक सुरक्षितता आणि आराम देणं आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.