रोटरी आणि इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर गाईडन्स’ उपक्रम
प्रतापगङ: रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर आणि इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘करिअर गाईडन्स’ (Career Guidance) या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी योग्य दिशा देण्यात आली.
या उपक्रमाला महाबळेश्वर एज्युकेशन सोसायटी आणि गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथील सुमारे ४०० विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी नाशिकचे प्रसिद्ध वक्ते श्री. राजेश साळवे आणि डॉ. सुधा साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेतगुताड येथील चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या उपक्रमासाठी स्वामी ग्रुपचे मालक श्री. संतोष पारठे यांनी विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बस आणि गाड्यांची सोय केली. महाबळेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्या सौ. शीला मिस आणि गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माने सर यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. विजय काळे आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. वर्षा पारठे यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनरव्हील क्लबच्या सदस्या सविता पल्लोड आणि रोटरी क्लबचे सदस्य दिनेश भिसे यांनी केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. विजय काळे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या सदस्या सौ. मुक्ता कोमटी, सौ. सपना अरोरा, पी.डी.सी. सौ. रोहिणी वैद्य, सौ. राधा मुक्कावार, सौ. शुभांगी काळे, सौ. सविता पल्लोड, तसेच रोटरी क्लबचे सदस्य श्री. धीरेन नागपाल, श्री. दिलीप रिंगे, श्री. दिनेश भिसे, सौ. स्वाती भांगडिया आणि सौ. सरोज जंगम यांसारखे मान्यवर उपस्थित होते. दोन्ही क्लबतर्फे आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार आणि शिक्षकांसाठी पाण्याची बाटलीची सोय करण्यात आली होती. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला.
