कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रोटरी आणि इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा संयुक्त पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

रोटरी आणि इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा संयुक्त पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

रोटरी आणि इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा संयुक्त पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

विजय काळे रोटरी अध्यक्ष तर वर्षा पार्टे इनरव्हील क्लब अध्यक्षपदी विराजमान

महाबळेश्वर, १८ जुलै: जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक आरोग्याकडेही प्रत्येकाने जागरूक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. ताणतणावामुळे माणसाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, आणि हा ताण दूर करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीसाठी दिवसातील एक तास द्यावा, असे प्रतिपादन खेड येथील प्रसिद्ध डॉ. संजीव धारिया यांनी रोटरी व इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या संयुक्त पदग्रहण समारंभात बोलताना केले. डॉ. धारिया यांनी महाबळेश्वर रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या लोकोपयोगी प्रकल्पांचे आणि समाजसेवेचे कौतुक केले आणि नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

रोटरी क्लब व इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा २०२५-२०२६ या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ नुकताच बाईक रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजीव धारिया, रोटरीचे असि. गव्हर्नर दीपक बागडे आणि पीडीसी रोहिणी वैद्य उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीची घोषणा:

रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी रो. विजय काळे यांची निवड झाली असून, सचिवपदी रो. महेश कोमटी विराजमान झाले आहेत. तर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौ. वर्षा संतोष पार्टे आणि सचिवपदी सपना अरोरा यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि इनरव्हील प्रार्थनेने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रो. दिनेश भिसे यांनी २०२४-२५ मधील विविध प्रकल्प आणि सेवाकार्याचा आढावा सादर केला. नूतन अध्यक्ष रो. विजय काळे आणि सचिव रो. महेश कोमटी यांनी मावळत्या अध्यक्षांकडून पदाची सूत्रे स्वीकारली. विजय काळे यांनी आपल्या मनोगतात ‘SERVICE ABOVE SELF’ या रोटरीच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पर्यावरण, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांत लोकउपयोगी प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी डॉ. रो. आशिष चोपडे आणि सी.ए. मिलिंद ढेबे या नवीन सदस्यांचे रोटरी परिवारात स्वागत करण्यात आले. रोटरी क्लबतर्फे सेठ गंगाधर माखरिया शाळेला संगणक संच भेट देण्यात आला.

इनरव्हील क्लबच्या पदग्रहण समारंभात मावळत्या अध्यक्षा नम्रता बोधे यांनी २०२४-२५ मधील सेवाकार्याचा आढावा सादर केला. नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. वर्षा पार्टे यांनी ‘Step Up & Lead by Example’ या इनरव्हीलच्या यंदाच्या थीमनुसार कार्य करणार असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सदस्यांचे आभार मानले.

  यावेळी गरिबीवर मात करून यश मिळवलेल्या ॲड. कोमल मोहन कारंडे या विद्यार्थिनीचा तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या वतीने यंदाचा “व्होकेशनल अवॉर्ड” महाबळेश्वर तालुक्यात उत्कृष्ट सेवा बजावत असलेले वीज वितरणचे सहाय्यक अभियंता चेन्ना रेड्डी यांना प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार विलास काळे यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, तर युवा पत्रकार प्रेषित शिरीष गांधी आणि रो. मोनाली शिर्के यांचाही सत्कार करण्यात आला. इनरव्हील क्लब परिवारात नव्याने सामील झालेल्या सदस्यांना पिन देऊन शपथ देण्यात आली.

माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टे आणि उद्योजक संतोष पार्टे यांच्यावतीने इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सामाजिक गिरिस्थान मुलींची शाळा क्र. ०२ साठी डिजिटल क्लासरूमची स्क्रीन व संच संतोष शिंदे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या समारंभास माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टे, बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे, माजी नगरसेविका विमल ओंबळे, शारदा ढाणक, उषाताई ओंबळे, लीलाताई शिंदे, संतोष पार्टे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीचे रो. राजन ढेबे, रो. महेश कोमटी, रो. दिनेश भिसे आणि इनरव्हीलच्या तृप्ती तोषनीवाल, गायत्री जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी व इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket