उंडाळे शेवाळवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर बचपन स्कूल जवळ दुचाकी गाडी वरून जाणाऱ्या शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला
तांबवे – उंडाळे ता कराड येथील उंडाळे शेवाळवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर बचपन स्कूल जवळ दुचाकी गाडी वरून जाणाऱ्या शाळकरी मुलावर हल्ला करून शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला
शेवाळेवाडी ता कराड येथील जयवंत शेवाळे यांचा व त्यांचा मुलगा प्रतीक जयवंत शेवाळे वय १५ हे दोघेजण उंडाळेचा आठवडी बाजार आटोपून सायंकाळी सात वाजता शेवाळेवाडी येथील आपल्या घरी निघाले असता उंडाळे पोलीस स्टेशन जवळ असलेल्या बचपन स्कूल जवळ शेतातून बिबट्याने अचानक दुचाकी वर चाललेल्या शेवाळे यांच्य गाडीवर हल्ला केला या हल्ल्यात पाठीमागे बसलेला प्रतिक शेवाळे हा जखमी झाला
त्याला तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे त्याची प्रकृती स्थिर असून बिबट्याच्या हल्ल्याने पिता पुत्र चांगलेच घाबरलेले होते बिबट्याने हल्ला केल्यानंतर शेवाळे यांनी गाडी वेगाने पुढे नेत स्वतःचा बचाव केला. सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी उंडाळे व शेवाळवाडी ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी लेखी मागणी
यापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी खासदार श्रीनिवास पाटील यासह राजकीय पदाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहेत परंतु बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आला नाही. परंतु सध्या बिबट्याने पाळीव जनावरे व मानवावर हल्ले सुरू केल्याने वनविभाग व प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ही उंडाळे व शेवाळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्या झाल्यात गंभीर जखमी झालेला प्रतीक शेवाळे .