कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » संविधान संघर्ष मोर्चाला साताऱ्यात विविध संघटनांचा प्रतिसाद

संविधान संघर्ष मोर्चाला साताऱ्यात विविध संघटनांचा प्रतिसाद

संविधान संघर्ष मोर्चाला साताऱ्यात विविध संघटनांचा प्रतिसाद

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांची जोरदार निदर्शने

सातारा-साताऱ्यात सोमवारी संविधान की सन्मान में हर भारतीय मैदान मे अशा घोषणा देत संविधान संघर्ष मोर्चा भव्य प्रमाणात काढण्यात आला .या मोर्चामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विविध गटासह अनेक सामाजिक संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता .शाहू चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाअभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली

हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला .मोर्चातील आंदोलकांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बूट फेक प्रकरणाचा निषेध करण्यात आला .रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट ‘आरपीआय आठवले गट ,आरपीआय गवई गट,आरपीआय निकाळजे गट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ,वंचित बहुजन आघाडी ,दलित महासंघ,लेक लाडकी अभियान सातारा,ऑल इंडिया मुस्लिम असोसिएशन ,छत्रपतींचा मुस्लिम मावळा , जनता क्रांती दल,द बुद्धिस्ट सोसायटी ‘इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते .

दुपारी दोन वाजता मोर्चाला साताऱ्यातून सुरुवात झाली अनेक आंदोलकांनी निळे झेंडे घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले .जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संघटनेच्या अनेक प्रतिनिधींनी अल्पसंख्याकांवर होणारे अन्याय संविधानात वारंवार होणारे हस्तक्षेप तसेच सन्माननीय न्यायपालिकेच्या सन्माननीय व्यक्तींना मिळणाऱ्या अपमानाच्या वागणूक याविषयी जोरदार टीका करण्यात आली .सर्व संघटनेच्या वतीने समन्वयक शिष्टमंडळांच्या सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले .या निवेदनाच्या माध्यमातून संविधान रक्षणासाठी सर्व संघटना कटिबद्ध असून अशा प्रकारचे कोणतेही हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket