Home » राज्य » नारीशक्तीचा बहुमान हाच खरा राष्ट्राचा सन्मान

नारीशक्तीचा बहुमान हाच खरा राष्ट्राचा सन्मान 

नारीशक्तीचा बहुमान हाच खरा राष्ट्राचा सन्मान 

होय आम्ही मतदान जनजागृती अभियान यशस्वी करणार, गौरीशंकरच्या नारीशक्तीचा निर्धार

लिंब – भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी होय आम्ही मतदान जनजागृती करणार असा निर्धार गौरीशंकरच्या नारीशक्तीने केला आहे. 8 मार्च 2024 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लिंब कॅम्पस मधील सर्व महिलांनी संघटित होऊन मी मतदान करणार व मतदानाचा हक्क प्राप्त समाज बांधवांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणार हा या निमित्ताने महिलांनी संकल्प केला आहे. मतदान हा लोकशाही प्रणालीचा आत्मा आहे आपल्या राष्ट्राची प्रगती आणि विकासात्मकतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भारतीय संविधान व लोकशाही अधिक बळकट होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत उस्फुर्त सहभाग नोंदवून नवप्रगतशील राष्ट्र घङवूया अशी शपथ व निर्धार आपण करूया असा संदेश महिलांनी दिला

गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब मधील शंभर नारीशक्तींनी संघटित होऊन शासनाच्या मतदान जनजागृती अभियानाला प्रतिसाद देत होय आम्ही नवमतदार बरोबरच मतदान चळवळ व्यापक करून मतदानाचा टक्का वाढविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी मतदानाचे महत्त्व व उपयुक्तता याबाबत समाज प्रबोधन व जनजागृतीचा निर्धार केला आहे .एक राष्ट्र एक ध्येय नवरराष्ट्र उभारण्याचा एक संकल्प हे ध्येय ठेवून सर्व समाज घटकापर्यंत हा संदेश आम्ही पोहोचवणार आहोत.

या उपक्रमाचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक ङाॅ.अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे ,आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर या सर्वांनी नारीशक्तीच्या उपक्रमाचे कौतुक केले .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket