Home » देश » आंबेघर-मेढा गणातून केळघर गावचे माजी सरपंच रविंद्र सल्लक यांना उमेदवारी द्यावी अशी ग्रामस्थांची व विभागातील कार्यकत्यांची आग्रही मागणी

आंबेघर-मेढा गणातून केळघर गावचे माजी सरपंच रविंद्र सल्लक यांना उमेदवारी द्यावी अशी ग्रामस्थांची व विभागातील कार्यकत्यांची आग्रही मागणी

आंबेघर-मेढा गणातून केळघर गावचे माजी सरपंच रविंद्र सल्लक यांना उमेदवारी द्यावी अशी ग्रामस्थांची व विभागातील कार्यकत्यांची आग्रही मागणी

मेढा प्रतिनिधी: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी लोकांशी संपर्क गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे .तालुक्यात राजकीय पटलावर असणारे केळघर गावचे सुपुत्र माजी सरपंच रविंद्र सल्लक हे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत.रवींद्र सल्लक यांच्या उमेदवारीला भागातून वाढता पाठिंबा मिळत आहे.

रविंद्र सल्लक केळघर गावचे सरपंच असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (बाबा महाराज ) यांच्या व विभागाचे नेते ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्यानेतृत्वाखाली अनेक विकासकामे केली आहेत.पिण्याच्या पाण्याची योजना असू द्या गावांतर्गत रस्ता , बंदिस्त गटर , अतिवृष्टी मध्ये गावचे पिण्याच्या पाण्याची विहीरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पुन्हा खोदून पूर्वव्रत करून स्कीम चालु केली.

अनेक लोकोपयोगी कामे करून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे .कोरोना काळात तर सर्व सामान्यांना आधार देण्याच काम केले आहे.स्वःता जिवावर उदार होऊन घर टू घर किटक नाशक फवारणी करून महामारी पासून सांभाळण्याचे काम केलं. एकमेकांशी साधे बोलणे शक्य नसताना अशा वेळी घरो घरी लोकांच्या गाटी भटी घेऊन आधार देण्याचे काम केले आहे. केळघर गावापुरते काम न करता आजू बाजुच्या गावांची सुद्धा काळजी घेण्याचे काम केले आहे.

त्यावेळचे पंचायत समिती गटविकास अधिकारी सध्याचे ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले ( बाबा महाराज ) यांचे ओएसडी सतीश बुध्दे यांच्या व त्यावेळचे तहसिलदार पाटील साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी संपूर्ण तालुक्यात स्वतःच्या वाहनाला स्पीकर लावून जनतेने भिऊ नये ,कोरोना पासून कसा बचाव कसा करायचा स्व:ताचे रक्षण कसे करायचे याबाबत त्यांनी जनजागृती देखील केली होती.लोकांना आधार देण्याचे काम केले आहे.

स्वताच्या जिवाची परवा न करता काम केले म्हणून पंचायत समिती जावली , तहसिलदार कार्यालय जावली यांच्या व अनेक गावच्या मंडळांच्या वतीने कोविड योध्दा म्हणून गौरवण्यात आले आहे.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून व जनतेत मिसळनारे नेतृत्व म्हणून रवींद्र सल्लक यांना आंबेघर गणातून उमेदवारी मिळावी अशी मागणी विभागातील नागरिकांनी केली आहे.

त्याच प्रमाणे तालुक्यातील सरपंच यांना स्थान मिळाले पाहिजे मानसन्मान मिळाला पाहिजे या करीता सरपंचांची संघटना असली पाहिजे म्हणून या मध्ये सहभाग घेऊन गावो गावी फिरून सर्व सरपंच एकत्र करून सरपंचांची संघटना उभे करण्यात सिंहाचा वाटा त्यांनी उचलला.त्यावेळी संघटक म्हणून काम केले शासनाने गावांतील स्ट्रीट लाईट लाईनचे बिल भरले नाही म्हणून गावातील स्ट्रीट लाईन बंद करण्यात आले होते.त्यावेळी संघटनेच्या वतीने कंदील मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचा प्रभाव पडून स्ट्रीट लाईट पूर्वत चालू करण्यात भाग पाडले .

अशी आनेक काम संघटनेच्या केली म्हणून फेरनिवडीत सरपंच परिषदेचे उपध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 

आंबेघर गणातील प्रत्येक गावातील नव्हेतर घराघरातील व्यक्ती ओळखतात याच्या फायदा या निवडणूकीत निश्चित फायदा होईल .

 जावळी तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीत आंबेघर तर्फ मेढा गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष आरक्षित असून, या गणातून ना. मा.श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले ( बाबा महाराज ) व या विभागाचे नेते आदरणीय रांजणे साहेब यांनी सल्लक यांना संधी द्यावी ग्रामस्थांची व कार्यकत्यांची मागणी आहे आंबेघर तर्फे मेढा गणातून मी निवडून येईल अशी खात्री सल्लक यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष २९ पैकी २४ महापालिकांत सत्ता, चुरशीच्या लढतीनंतर मुंबईत यश

Post Views: 41 राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष २९ पैकी २४ महापालिकांत सत्ता, चुरशीच्या लढतीनंतर मुंबईत यश मुंबई :विधानसभा आणि

Live Cricket