Home » Uncategorized » क्राईम डायरी » एकसर येथे पुलावरून रिक्षा पलटी होऊन एक जण ठार

एकसर येथे पुलावरून रिक्षा पलटी होऊन एक जण ठार

एकसर येथे पुलावरून रिक्षा पलटी होऊन एक जण ठार

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वाई तालुक्यातील पश्चिम भागात एकसर येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुलावरून रिक्षा पलटी होऊन या अपघातात रिक्षा चालक विशाल मुगुटराव कळंभे वय (37) या युवकाचा जागीच मृत्यू झाला

 घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विशाल कळंभे हा आपली रिक्षा घेऊन मंगळवारी पहाटे वाई वरून घरी निघाला होता. अचानक रस्त्याचा अंदाज न आल्याने रिक्षा ओढ्याच्या पुलावरून खाली कोसळली. या घटनेत विशाल कळंभे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते थेट ओढ्याच्या पाण्यात पडले. रात्रीच ही घटना घडलेली असावी रात्रीच लक्षात न आल्यामुळे पहाटे स्थानिक नागरिकांनी रिक्षा व मृतदेह पाण्यात पाहिला. गावातील युवकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विशाल कळंबे यांचा मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात आला आणि तो शवविच्छेदनासाठी वाई येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. विशाल कळंबे यांचा मृत्यू झाल्यामुळे एकसर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मोठा भाऊ, विवाहित बहीण व आई असा परिवार आहे. पश्चिम भागातील व गावातील अनेक युवक व ग्रामस्थांनी व शिवसेना नेते विकास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉ. नितीन सावंत, ऍड. जगदीश पाटणे, युवा नेते बाळासाहेब चिरगुटे आदिनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पुढील तपास वाई पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 296 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket