रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 1 देशी बनावटीच्या पिस्टलसह 1 जीवंत राऊंड हस्तगत
कराड प्रतिनिधी | कराड शहरानजीक मलकापुरात कराड स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाच्या वतीने आज शुक्रवारी सापळा रचून एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून 1 देशी बनावटीचे पिस्टल व 1 जीवंत काडतुस जप्त करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने मलकापुर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली. तसेच त्याच्याकडून 1 देशी बनावटीचे पिस्टल व 1 जीवंत काडतुस जप्त केले.
जीवन शांताराम मस्के (वय 30, रा. कराड ता. कराड जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड यांना त्यांचे बातमीदारा मार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर ता.कराड जि. सातारा येथील छत्रपती शिवाजी चौक येथे सापळा रचुन कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार जीवन शांताराम मस्के (वय 30, रा. कराड ता. कराड जि. सातारा) यास शिताफीने ताब्यात घेवन त्यांच्या कडून देशी बनावटीचे पिस्तूल व 1 जीवंत काडत्स ( राऊंड ) असा एकुण 66 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
कराड शहरातील गुन्हेगारांवर नियंत्रण ठिवण्यासाठी पोलीस अधिक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर सातारा यांचे मार्गदर्शनाखाल उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांनी कराड शहरातील गुन्हेगारी टोळया व गटातटांचा समुूळ नाश करण्यासाठी मोहीम सुरु केलेली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राज ताशिलदार यांचे मार्गदर्शनाखाली सदर मोहीमेच्या अनुशंगाने कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान छापा कारवाई करुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केलेली आहे.
सदरची कार्मगिरी पोलीस अधीक्षक श्री.तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजू ताशिलदार, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, पो.ना संतोष पाडळे, सज्ज़न जगताप, अनिल स्वामी, संदीप कुंभार, पो.शि. थिरज कोरडे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, मोहासिन मोमीन, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, मुकेश मोरे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
