Home » ठळक बातम्या » सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटी रुपयांची मान्यता आमदार मकरंद पाटील यांचा पाठपुरावा

सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटी रुपयांची मान्यता आमदार मकरंद पाटील यांचा पाठपुरावा

सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटी रुपयांची मान्यता

मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न*

गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४ आज सह्याद्री अतिथीगृह येथे सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा शिखर समितीची बैठक मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब त्यांच्यासमवेत उपस्थित राहिले.

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांच्या एकात्मिक विकासाकरिता पर्यटन विकास आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. या आराखड्यासाठी सुमारे ३८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यात श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास आणि कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटन यांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासास चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगार संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी व्यक्त केला आहे. तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब, आमदार मा. मकरंद पाटील यांच्यासह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची 

Post Views: 71 मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची  कोल्हापूर जिल्ह्याच् कागल तालुक्यातील बिरदेण डोणेच्या यशातही

Live Cricket