Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पुनर्वसन चे सर्व प्रश्न मार्गी लावणार आमदार मनोज दादा घोरपडे

पुनर्वसन चे सर्व प्रश्न मार्गी लावणार आमदार मनोज दादा घोरपडे

पुनर्वसन चे सर्व प्रश्न मार्गी लावणार आमदार मनोज दादा घोरपडे

जिल्हाधिकारी यांच्या समवेत पुनर्वसनची बैठक 

सातारा -आमदार मनोज घोरपडे यांनी कराड उत्तर मध्ये 33 पुनर्वशीत गावाच्या सरपंच उपसरपंच गावातील प्रमुख मंडळींची बैठक कलेक्टर ऑफिस येथील सभागृहामध्ये  जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. पुनर्वसन होऊन 25 ते 30 वर्ष झाले आहेत. तरी या गावांना 18 नगरी सुविधा मिळाल्या नाहीत. त्याच्यावरती लवकरात लवकर नियोजन करून ज्या नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत त्याचा कृती आराखडा तयार करण्यास सांगितले.

प्रोयोरिटी नुसार काम पूर्ण करणार असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्याधिकारी याशनी नागराजन,उपजिल्हाधिकारी गलांडे साहेब पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड साहेब यांची उपस्थिती होती. तारळी, कन्हेर, धोम, उत्तरमांड, व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ई. मुळे बाधित गावांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना सर्व सुविधा पुरवण्यात येतील. याचबरोबर काही गावांचं हस्तांतरण महसूल विभागात करण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले. यावेळी अदिती भारद्वाज, अतुल मेहत्रे, पवार साहेब, धीरज जाधव, संदीप काटे, धोंडीबा कोळेकर, दादासो काटे,अजित केंजळे, पांडुरंग साळुंखे,रामदास बाबर,नितीन जाधव, बाबुराव चौधरी, दीपक संकपाळ आदी ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 524 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket