Post Views: 105
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपति शिवाजी महाराजांच्या मोडितील पत्रांचे वाचन
सातारा दि.२३- जागतिक वारसा सप्ताहानिमित्त आज दि. 23 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्यावतीने व इतिहास संशोधन व वारसा जतन संस्था सातारा व दुर्गनाद ट्रेकींग अँव्हेंचर सातारा यांचे सहकार्याने छत्रपति शिवाजी महाराजांच्या मोडितील पत्रांचे मोडीलिपी तज्ञ घनश्याम ढाणे यांनी वाचन करून मार्गदर्शन केले.

यामध्ये दुर्गनाद ट्रेक अँव्हेंचर सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील इतिहास विभाग, त्याचप्रमाणे इतिहास संशोधन व वारसा जतन संस्था सातारा, वेद बचत गट सदस्यांनी इतिहासप प्रेमींनी भाग घेतला. यावेळी इतिहास प्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित इतिहास प्रेमींचे संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी आभार मानले.




