रायरेश्वर येते निश्चयी चारित्र्य – संकल्प राजं स्वहृदयी स्थापनेचा” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
वाई प्रतिनिधी -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला रायरेश्वर दुर्गावर (ता.वाई) प्रेरणा संवाद च्या बालचंमुच्या उपस्थितीत शिवगुणांच्या विचारांचे पुस्तक प्रकाशन होत आहे. पुस्तकाचे नाव आहे “निश्चयी चारित्र्य – संकल्प राजं स्वहृदयी स्थापनेचा”
या पुस्तकाचे प्रकाशक डॉक्टर मोहन सोनावणे प्रेरणा संवादचे संस्थापक सदस्य आहेत. शिवरायांच्या विचारांच्या पुस्तकाचे लेखक राहूल नकाते हे कोल्हापूर जिल्ह्यातले असून त्यांनी साताऱ्यातून आपल्या पुस्तकाचे प्रकाशन करायचे ठरवले हा एक वेगळाच संयोग अनुभवायला मिळणार आहे.
आपण अनेक लोक शिवरायांच्या विचाराने भारावलेले आहोत. अशा विचारांना आपण आपल्या आचरणात कसे आणायचे हे सहजतेने सांगणारे असे बोलके पुस्तक आहे. अगदी कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला वाचनीय असे हे पुस्तक आहे. आताच्या काळात प्रत्येकाच्या घराघरात हे पुस्तक असणे आवश्यक आहे.
प्रेरणा संवादच्या सदस्यांनी व प्रकाशक डॉक्टर मोहन सोनावणे सरांनी केलेल्या विनंतीला मान देत लेखक राहुल नकाते यांनी आपले पुस्तक सातारकरांसाठी सवलतीच्या दरात देणे मान्य केले आहे.
या पुस्तकाची मूळ किंमत 530 रुपये आहे. हे पुस्तक 19 फेब्रुवारी पर्यंत बुक केल्यास 280 रुपयेला उपलब्ध राहील. कार्यक्रमा दिवशी गडावर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
संपर्क 9422417415,
8668879648
