रानवडी गावच्या अभिनव उतेकरची सातारा जिल्हा साऊथ झोन संघात निवड
सातारा अंडर १४ संघात चमकदार कामगिरीच्या जोरावर निवड
सातारा -पोलादपूर तालुक्यातील रानवडी गावचे युवा उद्योजक सुशांत भाई उतेकर यांचा सुपुत्र अभिनव उतेकर याला बालपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. सातारा जिल्ह्यातील नामांकित श्रीपतराव विद्यामंदिर सातारा येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्याच्या या खेळाच्या जिद्दीमुळे क्रिकेट अकॅडमीमध्ये दाखल करण्यात आले. क्रिकेट अकॅडमी आणि इंटर स्कूल स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर अभिनव उतेकर याची निवड अंडर १४ सातारा जिल्हा क्रिकेट संघात करण्यात आली. सातारा जिल्हा क्रिकेट संघात देखील अभिनव उतेकरने चमकदार कामगिरी केले. त्याच्या सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीमुळे अभिनव सुशांत उतेकर याची सातारा जिल्हा साउथ झोन क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. त्याच्या खेळातील हे सातत्य कायम राहिले तर आगामी काळात महाराष्ट्रातील व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील अभिनव उतेकर चमकेल असे भाकीत क्रिकेट जाणकारांकडून करून व्यक्त केले जात आहे.
