Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राजपुरी शाळेत पुस्तकी ज्ञानाबरोबरच उद्योजकतेचे धडे

राजपुरी शाळेत पुस्तकी ज्ञानाबरोबरच उद्योजकतेचे धडे

राजपुरी शाळेत पुस्तकी ज्ञानाबरोबरच उद्योजकतेचे धडे

पाचगणी प्रतिनिधी- मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान देणे,व्यवहार कौशल्ये शिकवणे, पैशांची किंमत समजावणे आणि त्यांना उद्योजकतेची ओळख करून देणे आणि ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल अशा उपक्रमात सहभागी होणे या उद्देशाने जिल्हा परिषद आदर्श शाळा राजपुरी येथे सोमवार दिनांक १२ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांचा बालबाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या बाल बाजारात विविध प्रकारचा ताजा भाजीपाला , खाऊचे पदार्थ तसेच संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी संक्रांत वाणाचे आवश्यक साहित्य ,तिळगुळ, सौंदर्य प्रसाधने ,पतंग, खेळणी , शालापयोगी अशा विविध साहित्याची बाजारात रेलचेल दिसत होती.

विद्यार्थ्यांना साहित्याची खरेदी विक्री, हिशोब , ग्राहकांशी नम्रतेने संवाद याचा प्रत्यक्ष अनुभव या बाजारात मिळाला.या उपक्रमाचे उद्घाटन अशोक राजपुरे माजी पोलिस पाटील यांचे हस्ते झाले यावेळी शांताराम राजपुरे, आनंदा राजपुरे, विश्वास राजपुरे,अजय राजपुरे पोलिस पाटील, दत्तात्रय राजपुरे, बाळासाहेब घाडगे, मारुती राजपुरे संदीप राजपुरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,हरिभाऊ भिलारे, अपर्णा भिलारे, वंदना राजपुरे, शारदा राजपुरे,शोभा राजपुरे,सुभाष राजपुरे,तुकाराम कळंबे , अरविंद चोरट ,अमोल गायकवाड , उद्धव निकम, योगिता पोळ निलोफर शेख तसेच गावातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket