रहिमतपुर पोलीस ठाणे हद्दीतुन नागरीकांचे गहाळ झालेले एकून 2,90,000/-रु किमतीचे 20 मोबाईल हस्तगत
सातारा -मा.तुषार दोषी सो, पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधिक्षक सातारा मा.श्रीमती राजश्री तेरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण सो यांनी गहाळ झालेले मोबाईल यांचा शोध घेवुन मोबाईल हस्तगत करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्याचप्रमाणे रहिमतपुर पोलीस ठाणेकडुन सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री जी.बी. केंद्रे पोलीस हवा.ब.नं.102 बर्गे, पो.का.ब.नं.1305 चव्हाण, पो.का.ब.नं 1531 देशमुख,म.पो.का.ब.नं.267 कांबळे यांनी सी.ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबींचे आधारे महाराष्ट्र तसेच परराज्यामधुन मोबाईल मिळालेल्या लोकांशी संपर्क करुन हरविलेल्या माबाईलबाबतची माहिती प्राप्त करुन चिकाटीने व अथक परिश्रम करुन मोबाईल शोध मोहिम राबविल्याने रहिमतपुर पोलीस ठाणे हद्दीमधील एकुन 2,90,000/- किमतीचे एकुन 20 मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे. सदरचे मोबाईल श्री सचिन कांडगे सहा. पोलीस निरीक्षक रहिमतपुर पोलीस ठाणे यांचे हस्ते मुळ तक्रारदार यांना आज रोजी परत करण्यात आलेले आहेत. सदरची मोहीम मा. तुषार दोषी सो. पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधिक्षक सातारा मा. श्रीमती राजश्री तेरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण सो यांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने अविरतपणे राबवण्यात येणार असल्याचे श्री. सचिन कांडगे सहा. पोलीस निरीक्षक रहिमतपुर पोलीस ठाणे यांनी सांगितलेले आहे.
सदरची कारवाई मा. तुषार दोषी सो, पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधिक्षक सातारा मा. श्रीमती राजश्री तेरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस श्री सचिन कांडगे सहा. पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक श्री जी.बी. केंद्रे पोलीस हवा.ब.नं.102 बर्ग, पो.का.ब.नं.1305 चव्हाण, पो.का.ब.नं 1531 देशमुख, म.पो.का.ब.नं. 267 कांबळे यांनी पार पाडलेली आहे.
रहिमतपुर पोलीस ठाणे ऑगस्ट 2024 पासुन आजरोजीपर्यत 14,85,000/-रु किमतीचे एकुन 79 मोबाईल नागरीकांना परत करण्यात आलेले आहेत.




