Home » ठळक बातम्या » रहिमतपूर नगरपालिका सत्तांतराच्या दिशेने माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकानी केला भाजपमध्ये प्रवेश

रहिमतपूर नगरपालिका सत्तांतराच्या दिशेने माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकानी केला भाजपमध्ये प्रवेश

रहिमतपूर नगरपालिका सत्तांतराच्या दिशेने माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकानी केला भाजपमध्ये प्रवेश

25 वर्ष जे जमले नाही ते एका वर्षात करता आले म्हणून लोक भाजपमध्ये प्रवेश करतात आमदार मनोज दादा घोरपडे

सातारा -रहिमतपूर येथील माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. नाना एकनाथ राऊत (माजी उपनगराध्यक्ष रहिमतपूर नगरपरिषद) विकास पांडुरंग माने (दादा) माजी नगरसेवक रहिमतपूर नगरपरिषद तसेच अमर मदने (अध्यक्ष अदय क्रांतिवीर उमाजी राजे नाईक संघटना कोरेगाव ) नंदकुमार माने पाटील (अध्यक्ष आदर्श शिक्षण संस्था रहिमतपूर,माजी संचालक सह्याद्री साखर कारखाना), यशवंत चव्हाण,बाळासाहेब गोरेगावकर माजी नगरसेवक रहिमतपूर नगर परिषद, धनंजय माने (अध्यक्ष कोरेगाव तालुका केमिस्ट असोसिएशन) सुनील विठ्ठलराव माने, बापू राऊत (मिस्त्री), इंजिनीयर किसनराव राऊत ,बाळासो निकम,महेश शेरकर,अरुण नलवडे,बजरंग राऊत,सचिन नलावडे,अंकुश बोराटे, सुरेश निकम,राजेंद्र शेडगे,लाला माने अंकुश खवळे, लहूराज खवळे, गौरव कुलकर्णी, उमेश गोरेगावकर, विवेक पवार 

तसेच मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश घेतलेले विक्रमसिहं माने( माजी नगरसेवक रहिमतपूर नगर परिषद) विकास तुपे( माजी उपनगराध्यक्ष रहिमतपूर नगरपरिषद )साहेबराव माने (माजी नगरसेवक रहिमतपूर नगरपरिषद )प्रशांत भोसले यांचा सत्कार करण्यात आला…

   यावेळी बोलताना आमदार मनोज दादा घोरपडे म्हणाले कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये आज अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ते सत्तेच्या लालसे पोटी न येता विकासाच्या मुद्द्यावर ती प्रवेश करत आहेत. माजी आमदार जे 25 वर्ष करू शकली नाही ती कामे एका वर्षात मार्गी लावू शकलो याचे समाधान आहे.

 यामध्ये प्रामुख्याने हणबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजना, पाल इंदोली उपसा सिंचन योजना, उंब्रजचा पारदर्शक उड्डाणपूल, कराड उत्तर मधील प्रत्येक गावात केलेली विकास कामे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने होणारा विकास रहिमतपूर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच एका आर्थिक वर्षामध्ये आणलेली विकास कामे रहमतपुर मधील प्रत्येक समाजाला विश्वासात घेऊन केलेली कामे या सर्व कारणांमुळे आज कराड उत्तर मध्ये भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ चालू आहे

 

वरील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमा वेळी आमदार मनोज दादा घोरपडे,प्रदेश उपाध्यक्ष सौ चित्रलेखा माने कदम, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने, विरोधी पक्ष नेते निलेश माने, माजी नगरसेवक रहिमतपूर परिषद, साहेबराव माने, धनंजय पवार,मधुकर सावंत, प्रवीण माने, शंकर भोसले,

रणजीत माने, (रहिमतपुर मंडल अध्यक्ष ) राजू रोकडे, विक्रम माने (चेअरमन विकास सेवा सोसायटी रहिमतपूर) सदस्य विकास सेवा सोसायटी रहिमतपुर शेखर माने पाटील, अशोक माने, 

तुषार चव्हाण,जगदीश गायकवाड, प्रल्हाद शेरकर,दिलीप शेरकर, लिंबाजी सावंत, महेश भोसले, सुहास माने,दिलीप शेवाळे सतीश भोसले, आदिराज माने ,अक्षय चव्हाण,प्रवीण कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 22 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket