Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » पुष्पाला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

पुष्पाला 14 दिवसाची न्यायालयीन  कोठडी 

पुष्पाला 14 दिवसाची न्यायालयीन  कोठडी 

अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, अभिनेत्याची तेलंगणा हायकोर्टात धाव 

प्रतिनिधी -तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज पोलिसांनी अटक केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर त्याला आज नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अभिनेत्याने जामिनासाठी तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली आहे. इंडिया टुडेने यांसंदर्भात वृत्त दिलंय.

४ डिसेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी अटक करून रुग्णालयात नेलं. नंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली आहे.

अल्लू अर्जुनने स्क्रीनिंगला जाऊ नये, असं सांगण्यात आलं होतं, मात्र तरीही तो गेला; असं सरकारी वकिलांनी हायकोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं आहे. सध्या याप्रकरणी तेलंगणा हायकोर्टात सुनावणी चालू आहे. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर हायकोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 113 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket