Home » राजकारण » उपसा सिंचन योजनांची कामे तातडीने सुरु करा  पुरुषोत्तम जाधव यांची मागणी,मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा

उपसा सिंचन योजनांची कामे तातडीने सुरु करा  पुरुषोत्तम जाधव यांची मागणी,मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा

उपसा सिंचन योजनांची कामे तातडीने सुरु करा पुरुषोत्तम जाधव यांची मागणी , मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा

खंडाळा : तालुक्यातील निरा देवघर प्रकल्पांतर्गत असणाऱ्या गावडेवाडी , शेखमिरेवाडी , वाघोशी या उपसा सिंचन योजनांची अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी तसेच पश्चिम भागातील धोम बलकवडी पोट कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या चौदा गावांना नवीन उपसा सिंचन योजनेद्वारे ओलिताखाली आणण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जनलक्ष्मी योजनेतील कालवा प्रकल्पासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली. त्यामुळे खंडाळ्याच्या पाण्यासाठी शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे मंत्रालय सचिव दीपक कपूर तसेच मुख्य अभियंता जलसंधारण नार्वेकर यांच्याशीही चर्चा केली. यावेळी त्यांनी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सिंचन भवन येथे  कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या समवेत  बैठक केली. त्यावेळी शासन निर्णय निरा देवघर या प्रकल्पाच्या रूपाने प्रत्यक्ष कामासाठी ३६०२.८८ कोटी व अनुषंगिक खर्च रुपये ३७३.९५ कोटी रुपये तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये गावडेवाडी , शेखमिरेवाडी व वाघोशी या तीन उपसा सिंचन योजनांची संकल्पना व रेखाचित्रे मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेकडून प्राप्त होऊन अंतिम झाल्यावरच निविदा कार्यवाही करण्यात यावी. तसेच प्रकल्पाचे काम नियोजनानुसार सुधारित प्रशासकीय मान्यता किमतीच्या मर्यादित पूर्ण करण्यात यावे. संपूर्ण लाभ क्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थेत हस्तांतरित करावे. सदर प्रकल्पासाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर सुधारित प्रशासकीय  मर्यादेबाहेर जाऊन निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालातील मुद्द्यांची पूर्तता करावी. तसेच प्रकल्पाचे एकूण पाणी वापरामधून ०.९३ टीएमसी पाणी धोम बलकवडी प्रकल्पासाठी देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे असा शासन निर्णय झालेला आहे. यामध्ये तातडीने  उपसा सिंचन योजनांची संकल्पचित्रे  प्राप्त करून घ्यावीत अन्यथा खंडाळा तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी पाणी प्रश्नासाठी तीव्र आंदोलनाची भूमिका घेणार आहोत याची जबाबदारी शासनाची राहील अशी भूमिका पुरुषोत्तम जाधव यांनी घेतली. दुष्काळग्रस्त तालुका म्हणून आमच्या जमिनी कवडीमोल दराने औद्योगीकरणासाठी घेण्यात आल्या आमच्या पूर्वजांना पाण्याचे गाजर दाखवून आमच्या जमिनीवर पुनर्वसन लादण्यात आले आणि आमच्या वाट्याचे पाणी आमच्या डोळ्यात देखत वर्षानुवर्ष सातत्याने पळवण्यात आले कोणताही लोकप्रतिनिधी आमच्या या पाणी प्रश्नासाठी तोंड उचकटताना आतापर्यंत दिसला नाही म्हणून आता संघर्ष अटळ आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )-हिंदू बहुजन सन्मान

Live Cricket