यशोदा इन्स्टिट्यूट च्या प्रा. श्रेणिक सरडे यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एचडी
यशोदा इन्स्टिट्यूट सातारा येथील, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन शाखेतील प्रा. श्रेणिक सरडेयांना संशोधन कार्यासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी अर्थात पी. एचडी नुकतीच जाहीर करण्यात आली.
‘डेव्हलपमेंट ऑफ व्हाईट बैंक मेस्सीव मल्टी बैंक मेमो अँटेना फोर मिलिमीटर वेव’ असा शोध प्रबंध त्यांनी सादर केला. संशोधन कार्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कार्यकारी संचालिका सौ नमता सगरे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना या शोध कार्यासाठी डॉ. एस डी रुईकर यांचे मार्गदर्शन मिळाले. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या कॉलिटी एम्प्लिमेंट प्रोग्रॅम अंतर्गत त्यांनी हे संशोधन कार्य पूर्ण केले.
संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी, प्रा. डॉ. प्रवीणकुमार बड़दापुरे, सहसंचालक, कुलसचिव, विभाग प्रमुख आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. दशरथ सगरे यांनी शिक्षकांनी संशोधन कार्यामध्ये विद्यार्थ्यांची गोडी वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या कडून अधिकाधिक संशोधन करून घेण्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.