खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज कराडमध्ये
कराड येथे दिनांक 29 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सैदापूर च्या निस्तीर्ण मैदानात दुपारी एक वाजता भव्य सभा होत आहे. या सभेसाठी वातानुकूलित तीन दालने उभी करण्यात आली असून किमान एक लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा तसा तगडा बालेकिल्ला राहिला आहे. तो खेचून घेत भाजपचा झेंडा तेथे रोवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना भाजपने रणांगणात उतरवले असून उदयनराजे यांनी सुद्धा सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा इम्पॅक्ट काय असणार आहे, याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या तेजस्वी भाषणाची संपूर्ण सातारा जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे.