प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न-चेअरमन सौ. पुष्पलता बोबडे
सातारा :-प्राथमिक शिक्षक बँकेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सुरूवातीस मा. चेअरमन, मा. व्हा. चेअरमन व संचालक सदस्य यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून सभेच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली.
त्यानंतर अहवाल सालात ज्या थोर व्यक्ती, शहीद जवान, बँकेचे सभासद, सेवक दिवंगत झाले त्यांना श्रध्दांजली वाहणेत आली.बँकेच्या चेअरमन सौ पुष्पलता बोबडे यांनी प्रास्ताविकात प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अगत्यपूर्वक आणि आस्थेने, बहुसंख्यने उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक स्वागत केले. बँकेच्या आजपर्यतच्या विकासात्मक वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिलेले सर्व माजी चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक, खातेदार आणि सर्व सभासद बंधू भगिनी यांचेबद्दल चेअरमन सौ पुष्पलता बोबडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सभासदांची मागणी विचारात घेवून संचालक मंडळाने विविध कर्जाचे व्याजदरात कपात करून सभासदांना दिलासा देणेचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे चेअरमन सौ. पुष्पलता बोबडे यांनी सांगितले. तसेच बँकेने सभासदांचे आजारपणाची मदत, मयत सभासद मदत, विविध प्रकारचे अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा व नफा पातळी योग्य प्रमाणात राहणेसाठी उपाययोजना केल्यामुळे, तसेच खर्चातील काटकसर यामुळे ३१ मार्च २०२५ अखेरीस रू. ७ कोटी ७५ लाख ढोबळ नफा तर रू.२ कोटी ९८ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे.
संचालक मंडळाने सभासदांसाठी खास सवलतीच्या व्याजदरात नवीन कर्ज सुविधा केलेल्या असून त्यामध्ये इलेक्ट्रीक वाहन खरेदीसाठी [EV] रू. २५ लाखापर्यत कर्ज ८.००% व्याजदराने, घरगुती सौर ऊर्जा प्रकल्पासाठी रू.७ लाखापर्यत कर्ज ८.५०% व्याजदराने, दीर्घ मुदत कर्ज नं. २ रूपये २० लाखापर्यंत ९.८०% व्याजदर तसेच स्मार्ट टेक ओव्हर कर्ज सुविधा ८.६०% व्याजदराने चालू केली आहे. तसेच ओव्हर ड्रॉफ्ट कर्ज मर्यादा रू. १५ लाख केलेली आहे.
NEFT, RTGS, IMPS या सोबतच UPI, Phone Pay व Google Pay या मार्फत होणा-या प्रतिदिन व्यवहाराचे रक्कम मर्यादेत रू. ५०.०० हजार वरून रूपये १.०० लाखापर्यंत वाढ केली आहे.तसेच नेट बँकींग व्यवहाराद्वारे प्रत्येक ग्राहकास एका दिवशीची मर्यादा रू. २.०० लाख इतकी केलेली आहे.
येणा-या स्पर्धेच्या काळात सहकाराचे तत्व जपत बँकेचे सभासद आणि खातेदार यांची विश्वासार्हता जपून शिक्षक बँकेचा नावलौकिक उत्तरोत्तर वाढविण्यासाठी संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवेल असे मत व्हा. चेअरमन संजीवन जगदाळे यांनी व्यक्त केले.विषय पत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्यकार्य कारी अधिकारी श्री. अण्णासाहेब भोसले यांनी केले असून विषय पत्रीकितील सर्व विषय बहुमताने मंजूर झाले आहेत.
सदर सभेस बँकेचे संचालक ज्ञानवा ढापरे, नितीन काळे, किरण यादव, निशा मुळीक, महेंद्र जानुगडे, विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, नितीन फरांदे, विजय ढमाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, शहाजी खाडे, विजय बनसोडे तसेच सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी व्हा.चेअरमन संजीवन जगदाळे यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.
सेवेतील मयत कर्जदार सभासदांचे वारसांना बँकेचे विविध मदत निधीतून सध्या २०.१० लाख मदत दिली जाते त्यामध्ये वाढ करून ती रू.३०.१० लाख देण्याचा सभासद हिताचा निर्णय चेअरमन सौ. पुष्पलता बोबडे यांनी जाहीर केला.
