प्राथमिक शिक्षक बँक चेक बाऊन्स प्रकरणी हिराचंद देवकुळे यास ३ महिने कारावास व ३ लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाचा निकाल
सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, लि. सातारा बँकेचे कर्जदार सभासद हिराचंद दिनकर देवकुळे, रा. दुथेबावी, ता. फलटण, जि. सातारा यांनी थकीत कर्जापोटी दिलेला चेक न वटता परत आलेमुळे त्यांचे विरुद्ध बँकेने फिर्याद दाखल केली होती. त्याबाबत मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साो, न. अ. ओतारी यांचे न्यायालयात सुनावणी पूर्ण होवून न्यायालयाने आरोपी हिराचंद दिनकर देवकुळे यास पराक्रम्य संलेख अधिनियम १९८१ चे कलम १३८ नुसार तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २५५ (२) अन्वये दोषी ठरवून ३ महिने साध्या कारावासाची व ३ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीला ३ लाख रुपये दंड भरण्यास कसूर केलेस पुढे १ महिनेची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
